Breaking News
  • अमरावती जिल्ह्यातील आजपासून शाळा सकाळच्या सत्रात
  • मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणीच पाणी
  • समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, समृद्धी महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक ठप्प
  • सिया गोयल हिचे तिच्या मैत्रीणसोबतचे चॅट व्हायरल
  • पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी
  • पुणे-सोलापूर महामार्गावर टेम्पोला आग
  • अंबरनाथ पूर्वेतील पार्किंगच्या ठेकेदारांचे ठेके रद्द!
  • शेतीत काम करणारी 'महिला' आता 'शेतकरी': आ. श्वेता महाले पाटील
  • E20: 'सरकारचे प्रयोग, जनतेची परीक्षा?'

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Police Transfer

गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश, जनतेचा ठाणेदार म्हणून मिळविला विश्वास; धाडचे ठाणेदार API प्रताप दत्तात्रय भोस यांची बदली

धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रताप दत्तात्रय भोस यांची नुकतीच बदली झाली.


गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश जनतेचा ठाणेदार म्हणून मिळविला विश्वास धाडचे ठाणेदार api प्रताप दत्तात्रय भोस यांची बदली

Police Transfer |

प्रतिबंधात्मक कारवाया, दरोडा उकल, सामाजिक उपक्रम आणि लोकाभिमुख पोलिसिंगमुळे उमटविली वेगळी छाप

धाड (Police Transfer) : धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रताप दत्तात्रय भोस यांची नुकतीच बदली झाली असून, त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीविरोधातील प्रभावी कारवाया, उल्लेखनीय तपास, कायदा व सुव्यवस्था राखण्यात मिळवलेले यश तसेच समाजाभिमुख आणि लोकाभिमुख पोलिसिंगमुळे त्यांनी धाड परिसरात कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि जनतेचा विश्वास संपादन करणारे पोलीस अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.

कार्यकाळात API प्रताप भोस यांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवायांवर विशेष भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 111 अंतर्गत चार प्रभावी कारवाया करण्यात आल्या. तसेच BNS कलम 112 अंतर्गत जुगार चालविणाऱ्या चार टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची कारवाई करणारे भोस साहेब जिल्ह्यातील एकमेव ठाणेदार ठरले. संघटित व सराईत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 24 तडीपार प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले. यापैकी तीन गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध तडीपारची प्रक्रिया सुरू करण्यात आली. याशिवाय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी होणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध MPDA कायद्यांतर्गत तीन प्रस्ताव दाखल करण्यात आले. या सर्व कारवायांमुळे धाड परिसरातील गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश बसण्यास मोठी मदत झाली.

गुन्ह्यांच्या तपासातही API भोस यांनी उल्लेखनीय यश मिळविले. जानुना येथील गाजलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची यशस्वी उकल करून आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या तपासामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला.

धाड हे धार्मिक व सामाजिकदृष्ट्या अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत API भोस यांनी शांतता समित्या, ग्रामस्थ, सर्वधर्मीय नागरिक आणि उत्सव मंडळांशी सातत्याने समन्वय ठेवत नियोजनबद्ध बंदोबस्ताची अंमलबजावणी केली. परिणामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत, सलोख्याच्या वातावरणात आणि उत्साहात पार पडले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात धाड पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले.

पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतानाच API भोस यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. त्यांच्या पुढाकारातून स्वैच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे, महिला व बालकांची सुरक्षा, वाहतूक नियम, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती, कायद्याचे पालन आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने घेण्यात आली. विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती अभियान आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवादातून पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

ठाणेदार म्हणून कार्यरत असताना API प्रताप दत्तात्रय भोस यांनी ‘जनतेचा ठाणेदार’ अशी वेगळी ओळख निर्माण केली. धाड परिसरातील सर्वसामान्य नागरिक आपल्या अडचणी, तक्रारी आणि व्यथा थेट त्यांच्यापर्यंत दूरध्वनीद्वारे पोहोचवत असत. प्रत्येक तक्रारीची तत्काळ दखल घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन त्वरित, निष्पक्ष आणि कायदेशीर पद्धतीने समस्यांचे निराकरण करण्यात येत असे. त्यामुळे पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आणि पोलीस-जनता यांच्यातील संवाद अधिक बळकट झाला.

कठोर कायद्याची अंमलबजावणी, गुन्हेगारीविरोधातील धडक कारवाया, परिणामकारक तपास, संघटित गुन्हेगारीविरोधातील ठोस भूमिका आणि समाजाभिमुख पोलिसिंग यांचा उत्कृष्ट समन्वय साधत API प्रताप दत्तात्रय भोस यांनी धाड पोलीस ठाण्याच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली. त्यांच्या बदलीनंतर धाड परिसरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करण्यात येत असून, पुढील सेवाकार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related to this topic: