Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव

Police Raid

जळगावात एलसीबीची धडक कारवाई; सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्याच्या आरोपावरून २३ जणांना अटक

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या धडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत असल्याच्या आरोपावरून १३ पुरुष आणि १० महिलांना अटक करण्यात आली.


जळगावात एलसीबीची धडक कारवाई सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्याच्या आरोपावरून २३ जणांना अटक

Police Raid |

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली शिवारातील हॉटेलांच्या मागील शेतांवर छापा; अटकेत १३ पुरुष, १० महिला

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या धडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत असल्याच्या आरोपावरून १३ पुरुष आणि १० महिलांना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घोडसगाव-चिखली शिवारातील काही हॉटेलांच्या मागील शेतांमध्ये महिला आणि पुरुषांकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर एलसीबीच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकत कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी १३ पुरुष आणि १० महिलांना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या १० महिलांपैकी सर्व महिला राजस्थानमधील असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Related to this topic: