Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दक्षता समितीची बैठक संपन्न

३० मे रोजी हिंगोली येथे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला दक्षता समितीची बैठक पार पडली.


हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दक्षता समितीची बैठक संपन्न  

Police Awareness Meeting |

हिंगोली (Police Awareness Meeting) : ३० मे रोजी हिंगोली येथे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला दक्षता समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यातील सर्व १३ पोलीस ठाण्यांतर्गत नेमण्यात आलेल्या महिला दक्षता समितीचे सदस्य व सचिव या बैठकीस उपस्थित होते.  

पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना सौजन्याची वागणूक देणे, महिलांकडून प्राप्त तक्रारींची विनाविलंब दखल घेणे आणि पीडित महिला व मुलींच्या तक्रारी संवेदनशीलतेने हाताळण्यासाठी समाजातील विविध घटकांचे सहकार्य घेणे, या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अपर पोलीस महासंचालक, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठक घेण्यात आली.  

बैठकीदरम्यान जिल्हा महिला दक्षता समिती सदस्य मानसोपचार तज्ज्ञ डॉ. टिपक डोणेकर, विधीअधिकारी श्रीमती अनुसया पंडित आणि केंद्रीय शाळा शिक्षिका श्रीमती मिरा गणगे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.  

​​​​​​​

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासात तक्रार नोंदवून घेण्यापासून पीडितेला मानसिक पाठबळ, वैद्यकीय मदत, निवारा मदत अशा सर्व बाबींमध्ये पोलीस मदत मिळवून देण्यासाठी महिला दक्षता समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले.  

या बैठकीस पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. केंद्रे, महिला पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे महिला दक्षता समिती सदस्य, सचिव, दुय्यम अधिकारी व महिला पोलीस अंमलदार उपस्थित होते.  

बैठकीचे सूत्रसंचालन श्रीमती सपोनि प्रेमलता जगताप यांनी केले. भरोसा सेलचे पोउपनि शेख, मसपोउपनि श्रीमती पेंदोर, मपोह अनिता जाधव, मपोना सिमा पाटिल, मपोशि/घुमनर समुपदेशक खोडवे यांनी बैठकीचे आयोजन केले.

Related to this topic: