Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

पोलीस निरीक्षक राहुल देव्हडे

माओवादविरोधी अभियानातील शौर्याची दखल; चिखलीचे सुपुत्र राहुल देव्हडे पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नत

PI Rahul Devhade: चिखली येथील सुपुत्र तथा गडचिरोली पोलीस दलातील राहुल नामदेवराव देव्हडे यांच्या माओवादविरोधी अभियानातील धाडसी, शौर्यपूर्ण आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला मोठी दाद मिळाली आहे.


माओवादविरोधी अभियानातील शौर्याची दखल चिखलीचे सुपुत्र राहुल देव्हडे पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नत

PI Rahul Devhade |

 

मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्रांनी गौरव; राष्ट्रपतींचे 'पोलीस शौर्य पदक'ही प्राप्त

चिखली (PI Rahul Devhade) : चिखली येथील सुपुत्र तथा गडचिरोली पोलीस दलातील राहुल नामदेवराव देव्हडे यांच्या माओवादविरोधी अभियानातील धाडसी, शौर्यपूर्ण आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला मोठी दाद मिळाली आहे. माओवाद्यांविरुद्ध केलेल्या उल्लेखनीय कारवायांमुळे त्यांना पोलीस निरीक्षक (PI) पदावर वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली असून, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित 'पिपिंग' समारंभात त्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे लावून गौरविण्यात आले.

राहुल देव्हडे (PI Rahul Devhade) यांनी गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त भागात जीवाची पर्वा न करता अनेक धाडसी मोहिमा यशस्वी केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली माओवाद्यांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण मिळविणे, अनेक नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणासाठी प्रवृत्त करणे, तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि नक्षल साहित्य जप्त करण्याच्या कारवायांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी माओवाद्यांच्या आत्मसमर्पण मोहिमेत केलेल्या धाडसी आणि यशस्वी कार्याबद्दल विशेष प्रशस्तीपत्र प्रदान केले. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनीही माओवादविरोधी अभियानातील उल्लेखनीय कार्याबद्दल राहुल देव्हडे यांना गौरवून राष्ट्रपतींकडून प्रदान करण्यात आलेल्या *'पोलीस शौर्य पदका'*बद्दल अभिनंदन करणारे प्रशस्तीपत्र दिले आहे.

प्रशस्तीपत्रांमध्ये नमूद केल्यानुसार, राहुल देव्हडे (PI Rahul Devhade) यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अनेक धोकादायक मोहिमा यशस्वी करत वरिष्ठ माओवादी नेते आणि सदस्यांना आत्मसमर्पणासाठी प्रवृत्त केले. तसेच अनेक कारवायांमध्ये माओवाद्यांना अटक करून मोठ्या प्रमाणावर एसएलआर, रायफल, शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके आणि नक्षल साहित्य जप्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धाडसी आणि परिणामकारक कार्यामुळे माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले.

गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना या वेगवर्धित पदोन्नतीचा लाभ झाला असून, त्यामध्ये राहुल देव्हडे (PI Rahul Devhade) यांचा समावेश आहे. या पदोन्नतीमुळे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवी प्रेरणा मिळणार असल्याचे मानले जात आहे. राहुल देव्हडे यांच्या या यशामुळे चिखली शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.