Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

PM Awas Yojana

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी 'सूर्य घर मोफत वीज योजने'चा लाभ घ्यावा; गटविकास अधिकारी पल्लवी लांडे यांचे आवाहन

'प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजना'


पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा गटविकास अधिकारी पल्लवी लांडे यांचे आवाहन

रिसोड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन २०२४-२५२०२५-२६ या आर्थिक वर्षांमध्ये मंजूर घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या नव्याने बांधलेल्या घरावर 'प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजना' अंतर्गत छतावरील सौर ऊर्जा प्रणाली (Rooftop Solar) बसवून शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती रिसोडच्या गटविकास अधिकारी पल्लवी लांडे यांनी केले आहे.

वीज बिलातून होणार मुक्ती, पर्यावरणालाही मिळणार हातभार

पंचायत समिती रिसोड अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या आणि नवीन घराचे बांधकाम पूर्ण केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांच्या वीज बिलात मोठी बचत होण्यास मदत होणार असून, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेचा वापर वाढण्यासही चालना मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विद्यमान नियमांनुसार आकर्षक अनुदान (Subsidy) उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

याबाबत गटविकास अधिकारी पल्लवी लांडे म्हणाल्या, "ऊर्जा बचत, आर्थिक बचत आणि स्वच्छ भारताच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. रिसोड तालुक्यातील सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या हक्काच्या घरावर सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करावी."

Related to this topic: