Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातुर नगरपरिषद निवडणूक

पातुर नगरपरिषद निवडणूक: अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षांचे शक्तीप्रदर्शन

Patur Municipal Council: पातुर नगरपरिषद निवडणुकीत अंतिम दिवशी विविध राजकीय पक्षांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे


पातुर नगरपरिषद निवडणूक अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षांचे शक्तीप्रदर्शन

Patur Municipal Council Election |

 

नगराध्यक्षपदासाठी ८ तर सदस्यपदासाठी १२९ अर्ज प्राप्त

पातुर (Patur Municipal Council Election) : पातुर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध राजकीय पक्षांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजवला आहे.अंतिम दिवशी भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात अर्ज दाखल केले.

सकाळपासूनच पातुर नगरपरिषद (Patur Municipal Council Election) कार्यालय परिसरात उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. विविध पक्षांच्या उमेदवारांनी रॅली, घोषणाबाजी आणि पक्षाचे झेंडे घेऊन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. शहरातील प्रमुख मार्गांवर कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ दिसून आली. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आणि निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार बनले होते.

प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपरिषद कार्यालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून, सदस्यपदासाठी १२९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरून आपले दावे मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

Related to this topic: