Breaking News
  • पुणे महापालिकेच्या एकाच आरोग्य केंद्राचे दोनदा लोकार्पण
  • ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये झाड कोसळून ११ वाहनांचे नुकसान तर एक जण किरकोळ जखमी
  • जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई
  • पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ भागातील कारखान्यावर छापा
  • राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा मेळावा
  • उद्धव ठाकरे यांना मोठा झटका! आमदार सचिन अहिर यांचा शिंदेसेनेत प्रवेश
  • अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या कंधार मध्ये सत्याग्रह आंदोलन
  • नवी मुंबईतील वाशी भाजी मार्केट पावसामुळे कोसळलं
  • कल्याण कोळसेवाडीत जिममधील डंबेलच्या वादातून हल्ला लहान भावानंतर मोठ्या भावालाही बेदम मारहाण

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पक्रमशील शिक्षण उत्सव

उपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य: विजयसिंह गहिलोत

Talented Education Festival: पातूर येथील तुळसाबाई कावल मॅड्रक इयत्ता पाचवीच्या नवागत विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षणाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून स्वागत करण्यात आले


उपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य विजयसिंह गहिलोत

Talented Education Festival |

पातूर (Talented Education Festival) : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातूर येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ अंतर्गत इयत्ता पाचवीच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी उपक्रमशील प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत यांनी उपक्रमशील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. "उपक्रमशील शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ माहिती ग्रहण करणाऱ्या भूमिकेत न ठेवता, प्रत्यक्ष कृती, खेळ आणि संवादातून शिकविण्याची विद्यार्थी-केंद्री पद्धत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, समस्या सोडविण्याची क्षमता आणि ज्ञानाविषयीची आवड निर्माण होते," असे त्यांनी सांगितले.

प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या हाताच्या ठशांद्वारे पानगळ झालेल्या वृक्षाला नव्या पालवीचे प्रतीकात्मक रूप देण्यात आले. हा अभिनव उपक्रम एस. पी. नागरे मॅडम यांच्या विशेष पुढाकारातून राबविण्यात आला. तसेच एनसीसी पथसंचलनाद्वारे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेतर्फे विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच, पेन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या श्रावणी मोहन पवार हिचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

याप्रसंगी सचिव स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमनसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, उपमुख्याध्यापक आर. एस. ढेंगे, पर्यवेक्षक पी. एम. कारस्कर, संजय मुखाडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी अधिकारी सुभाष इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण गायकवाड यांनी मानले.

Related to this topic: