Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातूर दमदार पाऊस

दमदार पावसानंतर प्रशासनाची 'पोल-खोल'; मान्सूनपूर्व कामांचे वाजले बारा!

Patur Heavy Rain: जोरदार पावसाने पातूरत पाणीच्या सवळणीमुळे अनेक घरांत धोकादायक स्थिती निर्माण झाली. मान्सून पूर्व कामांचा प्रामुख्याने नुकसानकारक दावा केला गेला आहे.


दमदार पावसानंतर प्रशासनाची पोल-खोल मान्सूनपूर्व कामांचे वाजले बारा

Patur Heavy Rain |

 

पातूर शहरात अनेक घरांमध्ये शिरले पाणी; गुजरी लाईन परिसरातील जीर्ण भिंती अपघाताला निमंत्रण देण्याची भीती

पातूर (Patur Heavy Rain) : गेल्या अनेक दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पातूर तालुक्यातील बळीराजाला आज संध्याकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने दिलासा दिला असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र, याच पहिल्याच मोठ्या पावसाने पातूर नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामांची सपशेल पोल-खोल केली आहे. प्रशासनाने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती केल्याचा दावा केला होता, परंतु पहिल्याच जोरदार पावसात हा दावा साफ फोल ठरल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.

अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी

आज संध्याकाळी पातूर शहरात विजांच्या कडकडाटासह (Patur Heavy Rain) जोरदार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही वेळातच शहरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. मात्र, नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि नालेसफाईच्या अभावामुळे स्थानिक भोई वेटाळ, भीम नगर यासह इतरही अनेक सखल भागांतील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. अचानक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आणि घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. मान्सूनपूर्व नालेसफाई व्यवस्थित झाली असती, तर ही वेळ आली नसती, असा संतप्त आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

गुजरी लाईन परिसरातील जीर्ण भिंती ठरताहेत 'डेन्जर झोन'

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुजरी लाईन परिसरातील महाजन गल्लीमध्ये अनेक जुन्या आणि जीर्ण झालेल्या भिंती उभ्या आहेत. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे या भिंती आणखी खचल्या असून त्या कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुले ये-जा करत असतात. त्यामुळे या जीर्ण भिंती कोणत्याही मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

शनिवारच्या आठवडी बाजाराला फटका, व्यापाऱ्यांचे नुकसान

विशेष म्हणजे आज शनिवारी पातूर शहराचा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने अनेक लहान-मोठे व्यापारी आणि दुकानदार आपली दुकाने थाटून बसले होते. मात्र, अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे दुकानदारांचे व आठवडी बाजारातील व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन हक्काच्या धंद्याच्या दिवशी पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लोकप्रतिनिधींच्या भेटी; जनतेचे लक्ष उपाययोजनांकडे

घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळताच स्थानिक नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बाधित भागांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. मात्र, आता पहिल्याच पावसात (Patur Heavy Rain) ही अवस्था झाली असल्याने, येत्या संपूर्ण पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये आणि घरांमध्ये पुन्हा पाणी शिरू नये यासाठी नगर परिषद प्रशासन नेमक्या काय ठोस उपाययोजना करते, याकडे आता संपूर्ण पातूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: