Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

ट्रॅक्टर डिझेल परवानगी

परभणीत शेती कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल पुरविण्यास परवानगी...!

Tractor diesel allowed: परभणी जिल्ह्यातील शेती कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल पुरवण्यास परवानगी मिळाली. पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या मागणीनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी मुसळे यांनी आदेश दिले.


परभणीत शेती कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल पुरविण्यास परवानगी

Tractor diesel allowed |

 

संभाजी सेनेसह पेट्रोल डिझेल असोसिएशनची मागणी मान्य 
परभणी जिल्हा पुरवठा अधिकारी याचे आदेश ...!

परभणी (Tractor diesel allowed) : पेरणीपुर्व शेतीच्या मशागतीचे कामे ट्रॅक्टरमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. शेतीच्या मशागतीच्या कामासाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टरसाठी डिझेल पुरविण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी परवानगी दिली असून याबाबत संभाजी सेनेने तसेच जिल्हा पेट्रोल डिझेल डिलर असोसिएशनने निवदेनाव्दारे मागणी केली होती.

पेट्रोलीयम अधिनियम तरतुदीनुसार शेतीच्या मशागतीच्या कामासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रॅक्टरसाठी एकावेळी गरजेनुरूप जास्तीत जास्त १०० लिटर पर्यंत डिझेल पेट्रोल पंपावरून घेऊन जाण्यासाठी खालील अटी व शर्तीस अनुसरून परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी दिली. शेतीच्या मशागतीसाठी वापरण्यात येणार्‍या ट्रॅक्टरसाठी एकावेळी गरजेनुरूप जास्तीत जास्त १०० लिटर पर्यंत डिझेल देण्यात यावे.पेट्रोलियमच्या मानकानुसार धातूच्या किंवा मान्यताप्राप्त जाड प्लास्टिकच्या एप्रुव्हड कंटेनरमध्येच डिझेल दिले जावे. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर पूर्णतः प्रतिबंधित आहे. इंधन साठवणूक करण्याकरीता मान्यताप्राप्त स्टील किंवा लोखंडी कंटेनरचा वापर करून त्यामध्ये किमान ५ टक्के  रिकामी जागा ठेवणे अनिवार्य असणार आहे. साठवणुकीची जागा हवेशीर आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवण्यात यावी.

साठवणुकीच्या (Tractor diesel allowed) ठिकाणी 'धूम्रपान निषेध' आणि 'आगीपासून सावध' असे फलक लावलेले असावेत. डिझेल रिकामे करताना योग्य खबरदारी घ्यावी आणि गळती होणार नाही याची खात्री करावी. पेट्रोल पंपावरून शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रॅक्टरसाठी डिझेल घेऊन जातांना आधारकार्ड, अ‍ॅग्री स्टैंक नं., ७/१२, खातेदाराचे धारणक्षेत्र दर्शविणारा नमुना नं. ०८ अ. ट्रॅक्टरचे आर.सी. बुक इ. पुरावा देणे बंधनकारक राहील.पेट्रोलपंप चालक यांनी एक वेळ डिझेल दिल्यानंतर मागणीनुसार पुढील डिझेल १५ दिवसांचे अंतराने द्यावे.  पेट्रोल पंप चालकांनी अशा विक्रीची स्वतंत्र नोंद (नाव, मोबाईल, कारणासह) ठेवावी. सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवणे बंधनकारक राहील.वरील अटी व शर्तीस अनुसरून शेतीच्या कामासाठी डिझेल इंधन वाहतुक व साठवणूकसाठी परवानगी देण्यात येत असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी दिला आहे.

Related to this topic: