Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी पाथरी बंद

परभणीत नीट पेपरफुटीप्रकरणी पाथरी बंदला प्रतिसाद!

Pathri Bandh: पाथरी तालुक्यात दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी, लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाथरी बंद


परभणीत नीट पेपरफुटीप्रकरणी पाथरी बंदला प्रतिसाद

Pathri Bandh |

 

जंतर मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने; बँका, दवाखाने, शाळा व बससेवा नियमित

परभणी (Pathri Bandh) : पाथरी तालुक्यात दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच आंदोलकांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार  २३ जुलै रोजी पाथरी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सकाळपासूनच बहुतांश दुकाने बंद ठेवली. मात्र बँका, दवाखाने, मेडिकल दुकाने, शाळा तसेच बससेवा अत्याश्यक सुविधा सुरू होत्या . 

 वंचित बहुजन आघाडी, माकप आणि शिवसेना (उबाठा) यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी १२ वा सुमारास शहरातून रॅली काढून तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थी व युवकांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये जंतर मंतर येथील लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करावी तसेच आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या.