Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

गंगाखेड तलाठी कार्यालये

लॅपटॉप-प्रिंटर पडले धूळ खात; परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील तलाठी कार्यालये डिजिटल सुविधांपासून वंचित

Gangakhed Talathi Offices: गंगाखेड तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांच्या कामकाजात गती आणण्यासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले लॅपटॉप व प्रिंटर मागील तीन महिन्यांपासून तहसील कार्यालय


लॅपटॉप-प्रिंटर पडले धूळ खात परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील तलाठी कार्यालये डिजिटल सुविधांपासून वंचित

Gangakhed Talathi Offices |

परभणी (Gangakhed Talathi Offices) : गंगाखेड तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांच्या कामकाजात गती आणण्यासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले लॅपटॉप व प्रिंटर मागील तीन महिन्यांपासून तहसील कार्यालयातच पडून असून संबंधित कार्यालयांना त्यांचे अद्याप वाटप करण्यात आलेले नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे गंगाखेड तालुक्यातील अनेक तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांतील डिजिटल सेवा ठप्प झाल्या असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गंगाखेड तालुक्यातील अनेक (Gangakhed Talathi Offices) तलाठी कार्यालयांकडे अद्याप लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध नसल्याने सातबारा उतारे, होल्डिंग, फेरफार नक्कल तसेच इतर महसुली कागदपत्रे काढण्याचे काम प्रभावित झाले आहे. विशेषतः सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज व पीक विमा योजनांसाठी सातबारा उतारा अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय वाढली आहे.

तलाठी कार्यालयांमध्ये आवश्यक संगणकीय सुविधा नसल्यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाइन महसुली सेवा देण्यात अडथळे निर्माण होत असून नागरिकांच्या दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी शासनाच्या डिजिटल प्रशासनाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे शासनाने उपलब्ध करून दिलेले लॅपटॉप व प्रिंटर मागील तीन महिन्यांपासून तहसील कार्यालयात विनावापर पडून असल्याची माहिती समोर येत आहे. या उपकरणांची वारंटी व गॅरंटी कालावधी वापर न करताच कमी होत असून सार्वजनिक निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचा योग्य वेळी उपयोग होत नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गंगाखेड तालुक्यातील (Gangakhed Talathi Offices) सर्व तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांना तातडीने लॅपटॉप व प्रिंटरचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी, नागरिक तसेच महसूल विभागाशी संबंधित घटकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन रखडलेले लॅपटॉप-प्रिंटर वाटप तातडीने पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.