Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी टिप्पर चोरी

परभणीत टिप्पर चोरीचा गुन्हा उघड; वाशिममधून तुटलेले पार्ट जप्त

Parbhani Tipper Theft: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकने वाशिम येथे कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच टिप्परचे तुकडे जप्त केले आहे.


परभणीत टिप्पर चोरीचा गुन्हा उघड वाशिममधून तुटलेले पार्ट जप्त

Parbhani Tipper Theft |

 

परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; नवा मोंढा हद्दितून चोरी गेले होते वाहन

परभणी (Parbhani Tipper Theft) : शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दितून टिप्परची चोरी करत सदर टिप्परचे तुकडे करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकने वाशिम येथे कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच टिप्परचे तुकडे जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दितून एक टिप्पर चोरीला गेला होता. या (Parbhani Tipper Theft) प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. स्थागुशाच्या पथकाला सदर टिप्पर वाशिम येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. महेफुज रहेमान शेख रज्जाक, शेख नवीद शेख मकाजीत, सय्यद हुजर्‍या यांनी वाहन चोरी केल्याचे समजले. त्यानंतर स्थागुशाच्या पथकाने वाशिम येथे महेफुज रहेमान शेख रज्जाक याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने साथीदारांसोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. टिप्परची तोडफोड करुन शेडमध्ये ठेवल्याचे सांगितले.

पोलिसांनी शेडमधून टिप्परचे तुटलेले पार्ट जप्त केले. आरोपी महेफुज रहेमान याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी नवा मोंढा पोलिसात हजर करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थागुशाचे पोलीस अंमलदार दुधाटे, फड, कवठाळे, भदर्गे, लटपटे, क्षिरसागर, ढगे, हनवते यांच्या पथकाने केली.