Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अभय पाटील सावंत

अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे अभय पाटील सावंत यांनी मारली बाजी

Abhay Patil Sawant: ळमनुरी तालुक्यातील एका जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक अभय पाटील सावंत यांनी बाजी मारत सहकार क्षेत्रात दमदार 'एंट्री'


अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे अभय पाटील सावंत यांनी मारली बाजी 

Abhay Patil Sawant |

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पद निवडणूक

आखाडा बाळापूर (Abhay Patil Sawant) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक २०२६-२०३१ करीता कळमनुरी तालुक्यातील एका जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक अभय पाटील सावंत यांनी बाजी मारत सहकार क्षेत्रात दमदार "एंट्री" केली आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ निवडणूकीसाठी सेवा सहकारी संस्था मतदारसंघ ठराव देण्यापासून, उमेदवारी दाखल व आक्षेप, परभणी- पुणे सुनावणी असं राजकीय शह प्रतिशह राजकारण सहकार क्षेत्रात गाजल होते यासर्व घडामोडी नंतर २५ जून अर्ज छाननी नंतर विद्यमान संचालक माजी खासदार शिवाजीराव माने, शिवसेना युवा नेते माजी सरपंच अभय पाटील सावंत, शिवसेना जिल्हा संघटक माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, कळमनुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष दत्तराव कदम हे चौघेजण उमेदवारी दाखल केली होती.९ जुलै रोजी दिग्गज उमेदवार तथा माजी खासदार शिवाजीराव माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता यामुळे  आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक शिवसेना युवा नेते अभय पाटील सावंत,उबाठा शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, कळमनुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष दत्तराव कदम यांच्यात तिरंगी लढत झाली . रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली सोमवारी सकाळी मतमोजणी होऊन निकाल लागला.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणूकीत परभणी- हिंगोली जिल्ह्यातील दिग्गज बिनविरोध निवडून आले आहे.यात एकाच कुटुंबातील अनेक जण बिनविरोध आले आहे .कळमनुरी तालुक्यात ७९ मतदार आहे.संचालक मंडळासाठी १९ जुलै रोजी मतदान झाले तर निवडणूक निकाल २०जुलै रोजी लागला. आ.संतोष बांगर यांनी आपले कट्टर समर्थक अभय पाटील सावंत यांना मैदानात उतरवले होते तर दुसरीकडे उबाठा शिवसेनेकडून बॅंकेचे माजी उपाध्यक्ष तथा दिर्घकाळ संचालक राहिलेले उत्तमराव मगर यांचे चिरंजीव बाळासाहेब मगर हे उमेदवार आहेत तर कॉग्रेस तालुका अध्यक्ष दत्तराव कदम हे तिसरे उमेदवार मैदानात होते.

शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत अभय पाटील सावंत ३५ मते घेऊन विजयी झाले तर बाळासाहेब मगर यांना ३० मते मिळाली व दत्तराव कदम यांना १२ मते मिळाली तर १ मत बाद झाले.आमदार संतोष बांगर यांनी शेवटच्या टप्प्यात निर्णायक भूमिका बजावत आपल्या कट्टर समर्थक अभय पाटील सावंत यांना निवडून आणण्यासाठी केलेली राजकीय समीकरण यशस्वी ठरली.

Related to this topic: