Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

सोलार केबल चोरी प्रकरण

परभणीत मोटार, सोलार केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

Solar cable theft case: परभणीत साखला प्लॉट येथे मोटार व सोलार केबल चोरांचे सहा गुन्हे उकलले. आरोपी जेरबंद सथानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आणि १ लाख ७ हजार ६५० रुप्यांचा मुद्देमाल जप्त


परभणीत मोटार सोलार केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

Solar cable theft case |

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई सहा गुन्ह्यांची उकल

परभणी (Solar cable theft case) : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या मोटार व सोलार केबल चोरीच्या मालिकेतील एका फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून १ लाख ७  हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्या कबुलीजबाबावरून जिल्ह्यातील सहा चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १६ जून रोजी शहरात चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गस्त घालत होते. यावेळी साखला प्लॉट परिसरात फरार आरोपी गोरासिंग गुरुबच्चनसिंग दुधानी (रा. साखला प्लॉट, परभणी) हा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी साखला प्लॉट येथील मारोती मंदिर परिसरात सापळा रचून सायंकाळी सुमारे ५.१० वाजता आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने त्याचे साथीदार सोनुसिंग राजुसिंग जुन्नी व कालुसिंग बिन्नासिंग टाक (दोघेही रा. साखला प्लॉट, परभणी) यांच्यासह पूर्णा, दैठणा, ताडकळस, चुडावा व चारठाणा परिसरात मोटार व सोलार केबल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पूर्णा, ताडकळस, चुडावा, चारठाणा आणि दैठणा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण सहा चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १ लाख ७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी दैठणा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांचे तपासी अधिकारी करीत आहेत. (Solar cable theft case) सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक परिहार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश भुजबळ, पोलीस हवालदार नेताजी गित्ते, पोलीस हवालदार हुसेन खान व चालक पोलीस शिपाई साने  यांच्या पथकाने केली.

Related to this topic: