Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी पाणी पुरवठा योजना

परभणीत भूमिगत गटार, पाणी पुरवठा योजनेच्या नवीन प्रस्तावास मान्यता...!

Parbhani Water Supply Yojana: परभणीतील भूमिगत गटार व पाणी पुरवठा योजना रद्द करण्यावर निति नार्वेकर आणि सस्थायी समिती सदस्यांनी सहमती देऊन नवीन सुधारणांचा ठराव मंजूर


परभणीत भूमिगत गटार पाणी पुरवठा योजनेच्या नवीन प्रस्तावास मान्यता

Parbhani Water Supply Yojana |

 

परभणी मनपा स्थायी समिती बैठक; समितीच्या सर्व सदस्यांची उपस्थिती

परभणी (Parbhani Water Supply Yojana) : मंजूर असलेले जुने भूमिगत गटार, समांतर पाणी पुरवठा योजनेचे काम रद्द करुन नवीन वस्तींचा समावेश करत सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. बुधवार ८ जुलै रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 

स्थायी समिती सभापती प्रतिभा अतुल सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी स्थायीची बैठक झाली. यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर, नगर सचिव विकास रत्नपारखे यांच्यासह स्थायी समिती मधील सदस्य भगवान वाघमारे, सुनील देशमुख, नदीन इनामदार, आकाश लहाणे, डॉ. केदार खटींग, अक्षय देशमुख, व्यंकट डहाळे, बबलू टाक, अर्जून सामाले, शेख रईस शेख हबीब, सागर गंगाळे, नौशीन अलीम कुरेशी, प्राप्ती विकास राजापुरे, सुलोचना मदनराव भालेराव, सपना व्यंकटेश जुक्टे यांची उपस्थिती होती. स्थायी समितीच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर परभणी शहरातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रत्येक सदस्याने शहरातील समस्या सोडविण्या बाबत सूचना दिल्या.

शहरात होणार्‍या भूमिगत गटार व पाणी पुरवठा योजनेचे जुने काम रद्द करण्यात यावे, असा ठराव घेत सदस्यांनी मंजुरी दिली. सदर कामाला चार वर्षापूर्वी घेतलेल्या आराखड्या नुसार व दरानुसार मंजुरी देण्यात आल्यामुळे हे काम अर्धवट होणार असल्याचे सदस्यांनी बैठकीत मांडले. शहराची वाढलेली व्याप्ती लक्षात घेऊन तसेच आजचे कामाचे दर पाहिले असता नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या मागणीला एकमताने मंजुरी देण्यात आली. शहरातील वाढलेल्या वस्त्यांचा समावेश देखील या दोन्ही योजनांमध्ये होणार आहे. सध्या पावसाळा सुरू असून स्वच्छतेच्या कामांना मंजुरी देण्यात आली. खड्यांमध्ये मुरुम टाकण्याऐवजी कच टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related to this topic: