Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी अल्पवयीन मुली अत्याचार

परभणीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार;आरोपीस वीस वर्षाचा सश्रम कारावास...!

Parbhani Minor Girl Sexual Assault : परभणीतील एका गोड आंबे बांधण्यात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपासाठी, पोल्ट्री फार्ममध्ये नेतून लैंगिक अपराध करायला हातभार


परभणीत अल्पवयीन मुलीवर अत्याचारआरोपीस वीस वर्षाचा सश्रम कारावास

Parbhani Minor Girl Sexual Assault |

 

वर्षभराच्या आत खटल्याचा निकाल; ग्रामीण पोलीस ठाणे हद्दितील प्रकरण...!

परभणी (Parbhani Minor Girl Sexual Assault ) : गोड आंबे देतो म्हणून पोल्ट्री फार्मच्या पाठीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने वीस सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यात शुक्रवार १९ जून रोजी न्यायालयाने निकाल दिला. वर्षभराच्या आत खटल्यात निर्णय आला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाकडून मुख्य सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांनी काम पाहिले.

६ मे २०२५ रोजी तक्रार देण्यात आली होती. फिर्यादीची अज्ञात मुले शेतात सरपण आणण्यासाठी गेली असता आरोपी उत्तम धुराजी भदर्गे याने त्यांना गोड आंबे देतो, असे म्हणत पोल्ट्री फार्मच्या पाठीमागे नेऊन लैंगिक अत्याचार केला. या (Parbhani Minor Girl Sexual Assault) प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. पोउपनि. ज्योती बळेगावे यांनी तपास करत आरोपी उत्तम धुराजी भदर्गे याला अटक केली. घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर प्रकरण विशेष पोक्सो न्यायालय व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एम. सदराणी यांच्या समोर चालले. सरकार पक्षातर्पेâ आठ साक्षीदार तपासण्यात आले. पिडित मुलगी, फिर्यादी व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. अंतिम युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी उत्तम धुराजी भदर्गे याला पोक्सो अन्वये वीस वर्ष सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच इतर कलमांखाली अडिच वर्ष कारावास आणि दिड हजाराचा दंड सुनावला आहे. खटल्या दरम्यान आरोपी हा कारागृहातच होता. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि. सुरेश चव्हाण, पोह. वंदना आदोडे, वैशाली बिंडे यांनी काम पाहिले.

Related to this topic: