Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

पांदण रस्ता प्रकरण

परभणीत सुहागन पांदण रस्ता प्रकरण तापले...

Pandan Rasta Case : सुहागन ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राबविण्यात आलेल्या मातोश्री पांदण रस्त्याच्या कामामध्ये आर्थिक अपहार व भ्रष्टाचार


परभणीत सुहागन पांदण रस्ता प्रकरण तापले

Pandan Rasta Case |

 

चौकशीच्या मागणीसाठी परभणीतील पूर्णा तालुक्यात पंचायत समितीसमोर आमरण उपोषण!

परभणी (Pandan Rasta Case) : पूर्णा तालुक्यातील सुहागन ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राबविण्यात आलेल्या मातोश्री पांदण रस्त्याच्या कामामध्ये आर्थिक अपहार, बनावट कागदपत्रांचा वापर व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत सुहागन येथील युवकांनी पूर्णा  पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुहागन येथील योगेश नारायण भोसले व खुशाल भवानजी भोसले यांनी एप्रिल महिन्यात मातोश्री पांदण रस्ता कामातील कथित आर्थिक अपहार व अनियमिततेची चौकशी करण्याची तक्रार गटविकास अधिकार्‍यांकडे केली होती. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही चौकशी पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या युवकांनी सोमवार ६ जुलैपासून पूर्णा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.

जोपर्यंत प्रकरणाची (Pandan Rasta Case) निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. उपोषणस्थळी योगेश भोसले, खुशाल भोसले, ओम भोसले, आनंद भोसले, सुरेश भोसले, आदिनाथ भोसले यांच्यासह सुहागन ग्रामस्थ आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. पूर्णा पंचायत समिती प्रशासनाकडून या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले जात असून पुढील घडामोडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: