Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी जिल्हा परिषद

परभणी जि. प. मधील कर्मचार्‍याची पदोन्नती रद्द

Parbhani Zilla Parishad: जिल्हा परिषदचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुध्द विविध मुद्यावरील चौकशीत शासनाच्या निर्देशानुसार पाच सदस्यीय समितीने नियम डावलून पदोन्नती


परभणी जि प मधील कर्मचार्‍याची पदोन्नती रद्द

Parbhani Zilla Parishad |

 

तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा प्रताप
कर्मचार्‍याची मुळपदावर पद स्थापना

परभणी (Parbhani Zilla Parishad) : येथील जिल्हा परिषदचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुध्द विविध मुद्यावरील चौकशीत शासनाच्या निर्देशानुसार पाच सदस्यीय समितीने नियम डावलून पदोन्नती दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सीईओ नतिशा माथुर यांनी कर्मचार्‍यास मुळ पदावर पदस्थापना देण्याचे आदेश दिले आहेत.  
तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  जिल्हा परिषद अंतर्गत वैजनाथ सदावर्ते वर्ग ३ कर्मचारी हे लघूटंकलेखक या संवर्गात २०१९ मध्ये आरोग्य विभागात कार्यरत होते. सदरील पदावरील चेरेकर हे ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सदर पद एकाकी पद असल्यामुळे पदोन्नती व सरळ सेवेसाठी निश्चीत केले. निवृत्तीनंतर सदर पद हे सरळ सेवाभरती साठी निश्चीत होते. तथापी तत्कालीन कालावधीत संचिकेचे अवलोकन केले असता सदर पद पदोन्नतीने दर्शवून लघुटंकलेखक या पदाकरीता कनिष्ठ सहाय्यक या संवर्गातील लघूलेखन व टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण असलेल्या कर्मचार्‍यांची जेष्ठता प्रमाणे भरणे अपेक्षित होते. त्यामध्ये बि.के.ढोबळे व वैजनाथ सदावर्ते यांना पात्र करण्यात आले.

पदोन्नतीच्या यादीमध्ये मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना (Parbhani Zilla Parishad) पदोन्नती देण्यापूर्वी २५ मे २००४ च्या शासन निर्णयातील पात्रतेनूसार आरक्षणाचा लाभ मिळवून सेवाजेष्ठता यादीत वरच्या स्थानावर आली नाहीत याची खात्री करावी असे निर्देश होते. त्यानुसार ढोबळे यांच्या परिचर व अनुसूचित जाती प्रवर्गातून कनिष्ठ सहाय्यक या पदावरील सेवा जेष्ठता विचारात घेता ते सेवा जेष्ठ होते.पण त्यांना डावलण्यात आले. लघुटंकलेखक पद सरळ सेवेचे असल्यामुळे सदावर्ते यांना लघुटंकलेखक या पदावर दिलेली पदोन्नती नियामानूसार नसल्याचा अहवाल देवून पदोन्नती समितीने सदावर्ते यांना कनिष्ठ सहाय्यक या पदावर कायम करण्याची शिफारस केली. त्यानुसार सदावर्ते यांची कनिष्ठ सहाय्यक या पदावर कायम ठेवण्याचे आदेश जी.प.च्या. मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी काढले आहेत.