Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी नशामुक्त

परभणी जिल्हा मादक पदार्थापासून मुक्त करावा

Parbhani drug free: परभणी शहरात अमली पदार्थांची खुलेआम विक्री झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सय्यद खादर यांनी पोलीस अधिक्षकांना कठोर कारवाईची मागणी केली


परभणी जिल्हा मादक पदार्थापासून मुक्त करावा

Parbhani drug free |

 

सामाजिक कार्यकर्ते सय्यद खादर यांची मागणी
जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन 

परभणी (Parbhani drug free) : शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई अडकत आहे, त्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सय्यद खादर यांनी परभणी जिल्हा  नशामुक्त करण्याची मागणी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेत  शहरातील विविध भागांत खुलेआम अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली.

परभणी शहरात मोठ्या प्रमाणावर नवयुवक आणि तरुणाई, महाविद्यालयीन युवक व्यसनाच्या आहारी (Parbhani drug free) जात असल्याचे चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सय्यद खादर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची शांतता समिती बैठकीदरम्यान भेट घेतली. शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती दिली. यावेळी सय्यद खादर यांनी शहरातील अपना कॉर्नर, धार रोड, खंडोबा बाजार, वांगी रोड, इकबाल नगर परिसर, दर्गा रोड, दर्गा परिसर, साखला प्लॉट, गंगाखेड रोड हडको, वसमत रोड, करीम नगर, उघडामहादेव परिसर, खानापूर फाटा परिसर, एम.आय. डी.सी परिसर,  तसेच शहरातील विविध भागात व स्लम वस्तीत विविध प्रकारचे अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप केला.

टर्मिन इंजेक्शन, गांजा, चरस, पंचर जोडण्याची स्टिक फास्ट, व्हाइटनर तसेच नशेच्या विविध प्रकारच्या गोळ्यांची खुलेआम विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी गंभीर दखल घेत संबंधित माहितीची विचारपूस केली. (Parbhani drug free) अमली पदार्थ विक्री करणारे कोणी आढळल्यास थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी किंवा संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. अशा प्रकारच्या व्यसनाधीनतेमुळे तरुणाई शिक्षणापासून वंचित राहत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांना माहिती देण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्या क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना माहिती देता येईल व माहिती देणार्‍यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

एकाच हद्दीत विविध अवैध धंद्यांची शहरात चर्चा

दरम्यान, शहरातील सर्वात जुन्या नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैश्या व्यवसाय, चरस, गांजा, इंजेक्शन तसेच नशेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. काही भागांत शाळांच्या मैदानात संध्याकाळच्या वेळी तरुणांकडून नशा केली जात असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे. या (Parbhani drug free) अवैध व्यवसायांना नेमके कोणाचे पाठबळ आहे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात असून संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने छापेमारी करून कारवाई करावी, अशी मागणी परभणी शहरातील पालक व सामान्य नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: