Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बँकेच्या कथित मनमानी कारभाराच्या तणावात संस्थेच्या चेअरमनचा मृत्यू?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारामुळे निर्माण झालेल्या वाद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन नामदेवराव लव्हेकर यांच्या निधनाची घटना समोर आली आहे.


बँकेच्या कथित मनमानी कारभाराच्या तणावात संस्थेच्या चेअरमनचा मृत्यू

Parbhani DCC Bank |

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर नामदेवराव लव्हेकर यांचे निधन; चौकशीची मागणी

हिंगोली (Parbhani DCC Bank) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कथित कारभारामुळे निर्माण झालेल्या वाद आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन नामदेवराव लव्हेकर यांच्या निधनाची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे औंढा तालुक्यासह परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ ते मार्च २०२६ या कालावधीत कार्यरत असलेल्या बँकेच्या संचालक मंडळावर काही सेवा संस्थांना जाणीवपूर्वक अडचणीत आणल्याचे आरोप करण्यात आले आहेत. जडगाव आणि म्हाळसगाव येथील सेवा संस्थांमधील शेतकरी कर्ज नूतनीकरण प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यात आल्याचा दावा संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या निर्देशांनुसार कर्ज नूतनीकरणाची प्रक्रिया न राबविता संबंधित संस्थांना नगदी भरणा करण्यास भाग पाडण्यात आले. तसेच मार्च २०२६ मधील अंतिम मुदतीच्या काळात येहळेगाव येथील बँक शाखेत कर्मचारी अनुपस्थित असल्याने व्यवहार होऊ शकले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात पंचनामा झाल्याची माहितीही पुढे आली आहे.

या घडामोडींमुळे जडगाव सेवा संस्था थकबाकीत गेल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर संस्थेच्या ठरावाबाबत बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत आक्षेप नोंदविण्यात आला. विभागीय सहनिबंधक कार्यालयातील प्रक्रियेनंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात पोहोचले.

दरम्यान, संबंधित अपील प्रकरणातील निकालानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे नामदेवराव लव्हेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. उपचार सुरू असताना ११ जून २०२६ रोजी त्यांचे निधन झाले.

जडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्थापनेपासून नफ्यात कार्यरत होती. मात्र अलीकडील घडामोडींमुळे संस्थेला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागल्याचा आरोप ग्रामस्थ आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रारीही दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर शेतकरी आणि ग्रामस्थांकडून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासन तसेच संबंधित संचालक मंडळाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Related to this topic: