Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी घरफोडी प्रकरण

परभणीतील पाथरगव्हाण येथे घरफोडी: पंधरा दिवसानंतर गुन्हा दाखल....!

Parbhani Burglary Case: पाथरी  तालुक्यातील पाथरगव्हाण खु. येथे घरफोडी करण्यात आल्याची घटना सकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम


परभणीतील पाथरगव्हाण येथे घरफोडी पंधरा दिवसानंतर गुन्हा दाखल

Parbhani Burglary Case |

 

पाथरी तालुक्यातील घटना; सोन्याचे दागिने, रोकड लंपास

परभणी (Parbhani Burglary Case) : पाथरी  तालुक्यातील पाथरगव्हाण खु. येथे घरफोडी करण्यात आल्याची घटना सकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. सदर प्रकरणात पंधरा दिवसांनी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.अभय वसंत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ३० जून रोजी रात्री फिर्यादी व त्यांचा परिवार झोपी गेले. दुसर्‍या दिवशी पहाटेच्या सुमारास फिर्यादीचे वडिल झोपेतून उठल्यावर त्यांना घराचे गेट उघडे दिसले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. घरातून सोन्याचे गंठण, वेल, सेवनपिस, कानातील फुल, रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले. चोरट्यांनी एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. ही घटना १ जुलैच्या सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात १४ जुलै रोजी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरखेड ग्रामस्थांनी पकडले अट्टल चोरटे; गुन्ह्यांची उकल
पाथरी तालुक्यातील वरखेड येथे सोमवार १३ जुलै रोजी काही घरात चोरीचा प्रयत्न झाला. ग्रामस्थांनी पाठलाग करत तीन चोरट्यांना पकडले. चौकशीत पाथरगव्हाण खु. येथील घरफोडी आणि जनावर चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. ग्रामस्थांनी हाजु खाँ इस्माईल खाँ पठाण, महेश गोविंद चवरे, स्वामी श्रीकृष्ण अबदल यांना पकडले. पोलिसांनी संबंधितांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल चोरल्याचे निष्पन्न झाले. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.