Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी अपघाती मृत्यू

परभणीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; वाघलगाव पाटी जवळील घटना...!

Parbhani Accidental Death: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे वाघलगाव पाटी जवळील घटना: दुचाकीच्या चालकाने आबाजी भुजंगराव पांढरेला भरधावात गंभीर जखमी करून त्याचा मृत्यू झाला.


परभणीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार वाघलगाव पाटी जवळील घटना

Parbhani Accidental Death |

परभणी (Parbhani Accidental Death) : गंगाखेड येथे भरधाव वेगातील कार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरुवार १७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगाखेड पालम रस्त्यावरील वाघलगाव पाटीजवळ घडली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की पालम तालुक्यातील चाटोरीजवळील कोनेरवाडी येथून दुचाकीवरून गंगाखेडच्या दिशेने येत असलेल्या आबाजी भुजंगराव पांढरे वय ७२ वर्ष यांच्या दुचाकीला गंगाखेडच्या दिशेने समोरून भरधाव वेगात येत असलेल्या डिझायर कार चालकाने जोराची धडक दिल्याने आबाजी भुजंगराव पांढरे गंभीर जखमी झाले. वाघलगाव पाटी जवळ अपघात (Parbhani Accidental Death) झाल्याची माहिती समजताच खाजगी रुग्णवाहिका चालक दिपक सपकाळ, नामदेव दहिफळे यांनी घटनास्थळी जाऊन गजानन गव्हाणे यांच्या मदतीने जखमी आबाजी पांढरे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असता आबाजी पांढरे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. याप्रकरणी संतोष आबाजी पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात एमएच १४ डीयु ५०५० क्रमांकाच्या डिझायर कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.