Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी वकील संघ आंदोलन

जंतर-मंतर लाठीचार्जचा परभणी जिल्हा वकील संघाकडून निषेध; नीट परीक्षेत पारदर्शकतेची मागणी

Parbhani Bar Association Protest: जिल्हा वकील संघाच्या वतीने जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करण्यात आला.


जंतर-मंतर लाठीचार्जचा परभणी जिल्हा वकील संघाकडून निषेध नीट परीक्षेत पारदर्शकतेची मागणी

Parbhani Bar Association Protest |

 

पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

परभणी (Parbhani Bar Association Protest) : जिल्हा वकील संघाच्या वतीने जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. तसेच नीट परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

परभणी जिल्हा वकील संघाने जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध (Parbhani Bar Association Protest) करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच नीट परीक्षा अधिक पारदर्शक व पेपरफुटीमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. निवेदनावेळी वकील संघाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.