Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

परभणी बँक निवडणूक

निवडणूकीत आ.राजू नवघरे, राजामती मुटकुळे व अभय पाटील सावंत विजयी

Parbhani Bank Election: वसमत मधून आमदार राजूभैय्या नवघरे, हिंगोलीतून सौ. राजामती शिवाजीराव मुटकुळे आणि कळमनुरीतून अभय पाटील सावंत या तिन्ही उमेदवारांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला


निवडणूकीत आराजू नवघरे राजामती मुटकुळे व अभय पाटील सावंत विजयी

Parbhani Bank Election |

दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; अपेक्षेप्रमाणे तिन्ही उमेदवारांचा विजय
विजयानंतर समर्थका कडून मोठा जल्लोष 

हिंगोली (Parbhani Bank Election) : दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीच्या मतदानानंतर २० जुलैला मतमोजणी झाली. यामध्ये वसमत मधून आमदार राजूभैय्या नवघरे, हिंगोलीतून सौ. राजामती शिवाजीराव मुटकुळे आणि कळमनुरीतून अभय पाटील सावंत या तिन्ही उमेदवारांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. या विजयानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. 

या निवडणूकीसाठी २१ संचालक निवडण्यात आले. तर १३ संचालक बिनविरोध निवडूण आले होते. ८ संचालक निवडीसाठी १९ जुलैला मतदान पार पडले. २० जुलैला जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम्मध्ये मतमोजणी पार पडली. यामध्ये प्राथमिक कृषि पतपुरवठा/ वि.का.से.संस्था ता.वसमत यामधून आमदार चंद्रकांत नवघरे यांना ५८ मते पडल्याने ते विजयी झाले. त्यांच्या विरोधातील जाधव तुषार देवराव यांना केवळ २० मते मिळाली. यात १ मतदान अवैध ठरले. प्राथमिक कृषि पत पुरवठा / वि.का.से.संस्था ता. हिंगोली यामधून मुटकुळे राजामती शिवाजी यांना ५९ मतदान मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले. त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे रमेश विठ्ठलराव यांना ३१ मतदान मिळाले. ५ मते अवैध ठरली. प्राथमिक कृषि पत पुरवठा / वि.का.से.संस्था ता. कळमुनरी यामध्ये शेवाळा येथील सावंत अभय अरूणराव यांना ३५ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले. त्यांचे प्रतिस्पर्धी मगर बालासाहेब उत्तमराव यांना ३० तर कदम दत्तराव बापुराव यांना १२ मते मिळाली. एकुण ७७ मतदारांमध्ये १ मत बाद ठरले.  विजयाची घोषणा झाल्यानंतर हिंगोली, वसमत, कळमनुरी या ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आला.  

प्राथमिक कृषि पत पुरवठा / वि.का.से.संस्था ता. पुर्णा जि. परभणी यामधून डाखोरे नंदकुमार लक्ष्मणराव यांना ३४ मते मिळाल्याने ते विजयी ठरले. त्यांचे प्रतिस्पर्धी बोबडे तुळशिराम यशवंतराव यांना २८ मते मिळाली. एकुण ६२ मतदानामध्ये ३ मते अवैध ठरली. प्राथमिक कृषि पत पुरवठा / वि.का.से.संस्था ता. मानवत जि. परभणी चोखट आकाश पंडीतराव यांना २० मते मिळून ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी कदम अमोल गंगाधरराव यांना १५ मते मिळाली. इतर शेती संस्थामध्ये खान सईद शेरगुलखान यांना २९० मते मिळून ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी जामकर विजय रावसाहेब यांना २८७ मते मिळाली. एकुण ५७७ मतदानामध्ये ६ मते अवैध ठरली.

अनु जाती/ अनु जमातीमध्ये बोबडे शोभा हनुमंतराव यांना १२१६ मते मिळून त्या विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकुर प्रशास चंद्रशेखर यांना १२ तर रूमाले तुकाराम धोंडबा यांना ९, वाटोडे यशवंतराव चंपतराव यांना ११, सरोदे अतुल गोपीनाथराव यांना १७६, सारणीकर संजय ज्ञानोबा यांना ३ मते मिळाली. एकुण १४२७ वैध मतपत्रिकेत ५४ मतपत्रिका वैध ठरल्या. वि.ज./भ.ज/वि.मा.प्र. यामध्ये मायंदळे दत्तात्रय रामभाऊ यांना १०६६ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले. त्यांचे प्रतिस्पर्धी कुंडगीर अभय बालासाहेब यांना ५, परिहार स्वराजसिंह शिवपालसिंह यांना ३४८, फलके सुनंदा अशोकराव यांना ९, सोरेकर बळीराम रामचंद्र यांना ३ मते मिळाली. एकुण १४३१ वैध मतपत्रिकेत ५० मतपत्रिका अवैध ठरल्या.