Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी आषाढी एकादशी

परभणीतील पूर्णा शहरात विठूनामाचा गजर; आषाढीला लोटला भक्तीचा महापूर

Parbhani Ashadhi Ekadashi: परभणीत आषाढीच्या एकादशीला स्वातंत्र्य सेनिक क्रमश: दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानाने भक्तिसंस्काराचा महापूरण साकारले. मोंढा मैदानावर ऐतिहासिक रिंगण सोहळा


परभणीतील पूर्णा शहरात विठूनामाचा गजर आषाढीला लोटला भक्तीचा महापूर

Parbhani Ashadhi Ekadashi |

 

स्वातंत्र्य सैनिक कै. दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचा उपक्रम;
शहरातील जुना मोंढा मैदानावर ऐतिहासिक 'रिंगण सोहळा' रोमहर्षक!

परभणी/ पूर्णा (Parbhani Ashadhi Ekadashi) : ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’चा गगनाला भिडणारा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाचा कडकडाट आणि गगनभरारी घेणाऱ्या भगव्या पताकांच्या उत्साहात गुरुवारी पूर्णा नगरी अक्षरशः पांडुरंगमय झाली! निमित्त होते  स्वातंत्र्य सैनिक कै. दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित भव्य पालखी सोहळा व पारंपरिक रिंगण सोहळ्याचे. १४ वारकरी शिक्षण संस्थांच्या दिंड्या, फुलांनी सजवलेली नयनरम्य पालखी आणि जुना मोंढा मैदानावर पार पडलेला नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.

सोहळ्याची वैशिष्ट्ये:
१४ दिंड्यांचा सहभाग: टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांचा अलोट उत्साह.
नेत्रदीपक रांगोळी: चित्रकार रवि बिछडे यांच्या सुरेख रांगोळीने वेधले सर्वांचे लक्ष!
लेझीमचा कडकडाट: सज्जन जैस्वाल यांच्या लेझीम पथकाची शिस्तबद्ध प्रात्यक्षिके.
सामाजिक बांधिलकी: व्यापारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकडून भाविकांना फराळ व फळवाटप.

नवा मोंढा येथून भक्तिमय वातावरणात प्रस्थान!

सोहळ्याचा श्रीगणेशा नवा मोंढा येथून भावपूर्ण महापूजेने झाला. उत्तमराव कदम, विजयकुमार कदम, नगरसेविका मिनाक्षी कदम, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, नारायण महाराज टाकळीकर, भास्कर भाले, डॉ. विनय वाघमारे, डॉ. हरिभाऊ पाटील, डॉ. गुलाबराव इंगोले आणि अमृतराज कदम यांच्या शुभहस्ते श्री पांडुरंगाची विधीवत पूजा व आरती संपन्न झाली. यानंतर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीचे नगरप्रदक्षिणेसाठी उत्साहात प्रस्थान झाले.

रांगोळ्यांच्या पायघड्या अन् फुलांची उधळण!

पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, सुवासिनींनी केलेले औक्षण आणि फुलांची झालेली उधळण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. मार्गात व्यापारी बांधव, रेल्वे कर्मचारी व नागरिकांनी भाविकांसाठी फराळ आणि फळवाटपाची उत्तम सोय केली होती.

रिंगण सोहळ्याने गाठला भक्तीचा चरमबिंदू!

पालखी जुना मोंढा मैदानावर दाखल होताच पारंपरिक रिंगण सोहळ्याला प्रारंभ झाला. टाळांचा ठेका, अभंगाची सुरावट आणि वारकऱ्यांनी मारलेल्या फेऱ्या व रंगलेल्या फुगड्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे व पंचायत समितीचे उपसभापती काशीनाथ काळबांडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल कदम यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन गोपाळराव भुसारे व जगदीश जोगदंड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आर्यन कदम यांनी मानले. सोहळा शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कै. दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.