Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी शाखा अधिकारी

परभणीत शाखा अधिकार्‍याने केला दहा लाखाचा अपहार...?

Parbhani Branch Officer: अ‍ॅडव्होकेटे मल्टीस्टेट पर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा परभणी मध्ये आर्थिक अनियमिततेचा प्रकार पुढे आला आहे. शाखा अधिकारी याने सोसायटीची रक्कम बँकेतील सोसायटी


परभणीत शाखा अधिकार्‍याने केला दहा लाखाचा अपहार

Parbhani Branch Officer |

 

अ‍ॅडव्होकेट मल्टीस्टेट पर्पज को.ऑप. सोसायटी लि. परभणीतील प्रकार...!

नवा मोंढा पोलिसात गुन्हा

परभणी (Parbhani Branch Officer) : अ‍ॅडव्होकेटे मल्टीस्टेट पर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा परभणी मध्ये आर्थिक अनियमिततेचा प्रकार पुढे आला आहे. शाखा अधिकारी याने सोसायटीची रक्कम बँकेतील सोसायटीच्या खात्यामध्ये जमा न करता अपहार करत सोसायटीची फसवणूक केली आहे. १० लाख २२ हजार २७० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शाखा अधिकार्‍यावर २ जुलै रोजी नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

मनोज गंगाधरराव जोशी यांनी फिर्याद दिली आहे. सदर सोसायटीच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा आहेत. वकिलांच्या सेवेसाठी सोसायटी असून परभणी येथील शाखा २०१३ मध्ये स्थापन करण्यात आली. या शाखेत शाखा अधिकारी गैर व्यवहार करत असल्या बाबत अध्यक्षांना माहिती झाली. त्यानंतर अध्यक्षांनी फिर्यादीला शाखेतील आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याविषयी सूचना दिल्या.

शाखा अधिकारी अतुल काशीनाथ कासंडे याने १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या दरम्यान सोसायटी मधील जमा असलेली रोख रक्कम ९ लाख १२ हजार, नॉनज्यूडिशीअल स्टॅम्प पेपर रक्कम ५२ हजार ६००, कोर्ट फी लेबल्स रक्कम ५७ हजार ६७० अशी एकूण १० लाख २२ हजार २७० रुपयांची रक्कम सोसायटीच्या बँक खात्यामध्ये जमा केली नाही. सोसायटीने दिलेली जबाबदारी पार न पाडता रक्कमेचा आर्थिक अपहार करुन सोसायटीची फसवणूक केली. या प्रकरणी शाखा अधिकारी अतुल काशीनाथ कासंडे याच्यावर नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related to this topic: