Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी विकासकाम

परभणी शहरात ११० कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Parbhani Development Work: परभणी नगरपालिका विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागरिकांविरुद्ध मंत्री असलेल्या ११० कोटींच्या विकास योजनेची पहिली मंजुरी..


परभणी शहरात ११० कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Parbhani Development Work |

 

पहिल्या टप्प्यात मनपासाठी २० कोटी खा. संजय जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

परभणी (Parbhani Development Work) : शहरातील ११० कोटीच्या विविध विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात परभणी मनपासाठी २० कोटीच्या निधीचा शासन निर्णय आला आहे. खा. संजय जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.  

शहर महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी- सुविधांच्या विकासासाठी २० कोटी, नटराज रंग मंदिराच्या नवीन बांधकामासाठी ३० कोटी, परभणी महापालिकेच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी ६० कोटी असा एकूण ११० कोटी रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे. नगर विकास विभागाने महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी - सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूदी अंतर्गत निधी दिला आहे. यातून शहरातील विविध प्रभागात रस्ते, नाल्या, पथदिवे तसेच इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत सभापती प्रतिभाताई अतुल सरोदे यांनी शहरात समांतर पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजनेचे नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव घेतला होता.

या (Parbhani Development Work) प्रस्तावाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. या अगोदरच्या योजनेत समांतर पाणी पुरवठ्यासाठी १५० कोटी आणि भूमिगत गटारासाठी ४५० कोटीचा निधी होता. हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यानंतर शहराच्या वाढीव भागाचा प्रस्तावात समावेश करुन नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार समांतर पाणी पुरवठ्याच्या २५० कोटी आणि भूमिगत गटारच्या जवळपास ५७४ कोटी रुपयांच्या नवीन प्रस्तावास मंजुरी मिळेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 

परभणी शहराचा विकास हेच ध्येय
परभणी शहराचा सर्वांगीण (Parbhani Development Work) आणि नियोजनबध्द विकास हेच माझे ध्येय आहे. नागरीकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. २० कोटी रुपयांचा निधी आला आहे. उर्वरित निधीसाठीही सतत पाठपुरावा सुरू राहिल. पाणी पुरवठा, भूमिगत गटारच्या वाढीव प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. शहराचा पुढील तीस वर्षाचा विस्तार लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येणार आहे. यापुढेही शहराच्या विकासासाठी कटीबध्द आहे.
- खा. संजय उर्फ बंडू जाधव