Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मुंबई

Nerul Electric Shock

वसईत पुराच्या पाण्यात वाहने वाहून गेली; नेरुळमध्ये दोन विद्यार्थिनींना करंट, धाडसी युवकामुळे बचाव

मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी दोन गंभीर घटना घडल्या.


वसईत पुराच्या पाण्यात वाहने वाहून गेली नेरुळमध्ये दोन विद्यार्थिनींना करंट धाडसी युवकामुळे बचाव

Nerul Electric Shock |

मुसळधार पावसाचा तडाखा कायम; वसईत वाहनांचे मोठे नुकसान, नवी मुंबईत विद्युत प्रवाहाच्या धोक्यात सापडलेल्या दोन तरुणींचे प्राण वाचले

नवी मुंबई (Nerul Electric Shock) : मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी दोन गंभीर घटना घडल्या. वसईतील वाघराळ पाडा परिसरात नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली, तर नवी मुंबईतील नेरुळ येथे पावसाच्या पाण्यातून जात असताना दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसला. दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली.

वसईतील वाघराळ पाडा परिसरात मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. काही क्षणांतच पाण्याच्या वेगवान प्रवाहाने पार्किंगमध्ये उभी असलेली तीन दुचाकी, एक वॅगनआर कार आणि मारुती इको कार वाहून गेली. या घटनेदरम्यान इको कारमध्ये असलेल्या चंद्रकांत किणी यांनी प्रसंगावधान राखत धाडसी प्रयत्न करून दोघांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या धाडसाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वसई-विरार परिसरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच नाले, ओढे आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

दरम्यान, नवी मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नेरुळ एल.पी. ब्रिजखाली धक्कादायक घटना घडली. भूमिगत विद्युत वाहिनी उघडी पडल्याने आणि त्यावरील कोटिंग निघाल्यामुळे शॉर्टसर्किट झाले. याच ठिकाणाहून पाण्यातून जात असलेल्या १६ ते २० वर्षे वयोगटातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्या.

विजेचा धक्का बसताच दोघीही पाण्यात कोसळल्या. त्यावेळी तेथून जाणारे प्रकाश राजपुरोहित यांनी प्रसंगावधान दाखवत हातातील गमछा आणि छत्रीच्या सहाय्याने दोघींना विजेच्या प्रवाहापासून दूर खेचले. छत्रीच्या मदतीने विद्यार्थिनीची बॅग ओढून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दोन्ही तरुणींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

Related to this topic: