Breaking News
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
  • परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले
  • एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे
  • मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
  • सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली.
  • डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा
  • छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

Naxal Supporter Arrest

११ वर्षांनंतर गावात आलेल्या कट्टर नक्षल समर्थकाला पोलिसांनी केली अटक; खून प्रकरणात होता फरार

मागील ११ वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या नक्षल समर्थक आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.


११ वर्षांनंतर गावात आलेल्या कट्टर नक्षल समर्थकाला पोलिसांनी केली अटक खून प्रकरणात होता फरार

Naxal Supporter Arrest |

माओवाद्यांना रसद व गुप्त माहिती पुरवणाऱ्या 'जनमिलिशिया' संघटनेशी संबंधित आरोपीला असरअल्ली पोलिसांची कारवाई

गडचिरोली (Naxal Supporter Arrest) : मागील ११ वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या नक्षल समर्थक आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकावर हल्ला यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) असे असून, तो ग्राम रक्षक दल यादीतील आरोपी आहे. तसेच, माओवाद्यांना रसद आणि गुप्त माहिती पुरवणाऱ्या 'जनमिलिशिया' संघटनेशी संबंधित असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनेक वर्षांपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडून सातत्याने विशेष शोधमोहीम राबविण्यात येत होती. दरम्यान, १७ जून रोजी आरोपी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी नडीकुडा गावात आल्याची गोपनीय माहिती असरअल्ली पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने नडीकुडा गावाला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. यावेळी आरोपी गावालगतच्या शेतशिवार परिसरात आढळून आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीविरुद्ध असरअल्ली पोलीस ठाण्यात खून, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांवर हल्ला, दंगल आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१५ मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात तो तब्बल ११ वर्षांपासून फरार होता. या प्रकरणातील एका सहआरोपीला यापूर्वीच गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

आरोपीला न्यायालयीन कोठडी

अटक करण्यात आलेल्या बापू व्यंकटी जनगम याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या नेतृत्वात असरअल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगिराज जाधव, पोउपनि. प्रसाद पवार तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

Related to this topic: