Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नॅशनल हायवे मृत्यू

खानापूर चिता येथे वन्यजीवांसाठी नॅशनल हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा

National Highway Death Trap:


खानापूर चिता येथे वन्यजीवांसाठी नॅशनल हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा

National Highway Death Trap |

 

अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू

खानापूर चिता (National Highway Death Trap) : हिंगोली ते नांदेड जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ खानापूर चिता परिसरात वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्ता ओलांडणाऱ्या वन्य प्राण्यांचे अपघाताने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काल याच महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वानराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्राणी मित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पैलवान सोपान जाधव पाटील, बाळासाहेब पवार, गोपाल पवार आणि रामप्रसाद जाधव यांच्या सहकार्याने मृत वानरावर विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले. 

स्थानिक प्राणी मित्रांनी वारंवार सूचना देऊनही वनविभागाने या (National Highway Death Trap) महामार्गावर अद्याप वन्यजीव क्रॉसिंगचे फलक लावलेले नाहीत. फलक नसल्याने आणि वाहनांचा वेग जास्त असल्याने आतापर्यंत शेकडो वन्यजीवांचा बळी गेला आहे. 

या परिस्थितीमुळे वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वनविभागाने तातडीने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वन्यजीव सूचना फलक व वेगमर्यादा फलक लावावेत, अशी मागणी संस्थेचे रामप्रसाद जाधव आणि ओम जाधव यांनी केली आहे. फलक न लावल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. या (National Highway Death Trap) मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी देखील वन्यजीवांचा विचार करून संथ गतीने वाहने चालवावीत, असे आवाहन प्राणी मित्रांनी केले आहे.