Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

ॲड. गौतम भद्रे

ॲड. गौतम भद्रे यांना यंदाचा 'छ. राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार' घोषित

Adv. Gautam Bhadre: ॲड. गौतम भद्रे यांना फुले-आंबेडकरी चळवळीतील योगदानावर आधारित 'छ. राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार' २०२६ प्रदान करण्यात


ॲड गौतम भद्रे यांना यंदाचा छ राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार घोषित

Adv. Gautam Bhadre |

​नांदेड (Adv. Gautam Bhadre) : अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा असलेला 'छ. राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार २०२६' नांदेडचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. गौतम भद्रे (Adv. Gautam Bhadre) यांना जाहीर करण्यात आला आहे.

​फुले-आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रातील त्यांच्या निःस्वार्थ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी अधिकृत घोषणा पुरस्कार निवड समितीच्या वतीने करण्यात आली. अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने नुकतेच त्यांना या पुरस्काराचे निवडपत्र प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

​छ. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी २६ जून २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता सिडको, नवीन नांदेड येथे पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते ॲड. गौतम भद्रे यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती 'छ. राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार २०२६' निवड समितीचे प्रमुख अँड. सुजाता पोहरे, डी. एस. वाघमारे, बा. रा. वाघमारे यांनी दिली आहे.

​ॲड. गौतम भद्रे (Adv. Gautam Bhadre) यांच्या या यशाबद्दल आणि त्यांना हा मानाचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल ॲड. शेख शकील बशिरोद्दीन, ॲड. पंकज कसबे, पत्रकार पवन जगडमवार, ॲड. शेख मुदस्सीर, ॲड. सुमित पवळे, अँड. संतोष गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कायदेशीर आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related to this topic: