Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आ. राजू नवघरे

आ. राजू नवघरे यांच्या घोडदौडीत आणखी एका विजयाची भर

MLA Raju Navghare: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत वसमतगटातून अपेक्षेप्रमाणे आमदार राजू पाटील नवघरे यांचा एकतर्फी सहज विजय झाला


आ राजू नवघरे यांच्या घोडदौडीत आणखी एका विजयाची भर

MLA Raju Navghare |

 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तोच जिंकला जो कधी हारलाच नाही

वसमत (MLA Raju Navghare) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत वसमतगटातून अपेक्षेप्रमाणे आमदार राजू पाटील नवघरे यांचा एकतर्फी सहज विजय झाला त्यांना ७९ पैकी ५८ मत मिळाली निकाल लागताच वसमत मध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. या निवडणुकीत पुन्हा एकदा 'तोच जिंकला जो कधी हरलाच नाही' अशा प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.

सामाजिक कार्यातील सातत्य, थेट जनसंपर्क आणि संघटन शक्तीच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे वसमतचे  आ. राजू पाटील नवघरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा दिमाखदार विजय मिळवत आपल्या विजयाच्या घोडदौडीत आणखी एका यशाची नोंद केली आहे. या विजयामुळे वसमत तालुक्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार राजू पाटील नवघरे यांना लढतीला सामोरे जावे लागले होते या निवडणुकीत त्यांना सर्वपक्षीय परंपरागत विरोधकांच्या सामुहिक विरोधाचा सामना करावा लागला या निवडणुकीत आमदार राजू पाटील नवघरे यांच्या विरोधात उभे असलेल्या तुषार जाधव या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आमदार राजू पाटील नवघरे  यांना खिंडीत पकडण्यासाठी सर्व परंपरागत विरोधक सक्रिय झाले होते मात्र निकालावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही ७९ पैकी तब्बल ५८ मत आमदार नवघरे यांना पडले तुषार जाधव यांना २० मतांवर समाधान मानावे लागेल. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली यावेळी 'तोच जिंकला जो कधी हारलाच नाही' अशा प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमदार नवघरे यांनी विजयाची मालिका कायम राखली सोमवारी निकाल जाहीर होताच  राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत प्रचंड जल्लोष केला व आमदार नवघरे यांचा भव्य सत्कार केला.

तोच जिंकला जो कधी हरलाच नाही
 तोच जिंकला जो कधी हरलाच नाही, अपराजित योद्धा ही उक्ती आमदार नवघरे यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली आहे आजपर्यंत त्यांनी बाभूळगावच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच पदापासून ते विधानसभा निवडणुक स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्र आणि विविध राजकीय संघर्षांमध्ये त्यांनी सातत्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रत्येक निवडणुकीत संघटनबळ आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास, त्यांच्या कामाची पावती यांच्या जोरावर त्यांनी विजयाची परंपरा कायम राखली आहे. आत्तापर्यंत त्यांनी २५ ते ३० निवडणुका लढवलेले आहेत या सर्व निवडणुकांमध्ये ते अपराजित योद्धा म्हणून ओळखले गेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही त्यांनी एकतर्फी विजय मिळवला व अपराजित योद्धा म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताना  'तोच जिंकला जो कधी हरलाच नाही 'अशा प्रतिक्रिया ही व्यक्त केल्या.

Related to this topic: