Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

SIR मोहिम

SIR मोहिमेमुळे मतदार यादीतील संशयास्पद नोंदी उघड; नागरिकांनी स्वतःची नोंद तपासून तक्रार करण्याचे आवाहन

SIR Campaign: बुलढाणा तालुक्यातील रायपूर (चिखली विधानसभा मतदारसंघ) येथील काही मतदान केंद्रांच्या ऑनलाइन मतदार यादीत अत्यंत विचित्र स्वरूपाच्या नोंदी आढळल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह


sir मोहिमेमुळे मतदार यादीतील संशयास्पद नोंदी उघड नागरिकांनी स्वतःची नोंद तपासून तक्रार करण्याचे आवाहन

SIR Campaign |

चिखली (SIR Campaign) : निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेमुळे मतदार यादीतील अनेक त्रुटी आणि संशयास्पद नोंदी नागरिकांच्या निदर्शनास येऊ लागल्या आहेत. बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघरांत जाऊन मतदारांची पडताळणी करत असल्याने मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

याच पार्श्वभूमीवर बुलढाणा तालुका आणि चिखली विधानसभा मतदारसंघातील रायपूर गावासह काही भागांतील ऑनलाइन मतदार यादीमध्ये काही विचित्र आणि अर्थहीन नावे आढळल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये "मोहम्मद अफगाणिस्तान", "बिस्तर पर जाना" आणि "पुराना" अशा स्वरूपाच्या नोंदी दिसून येत आहेत. या नोंदी प्रत्यक्ष मतदारांच्या आहेत की डेटा नोंदणीतील तांत्रिक किंवा मानवी त्रुटी आहेत, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही.
मात्र, या घटनेमुळे SIR मोहिमेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. मतदार यादीतील चुकीच्या, संशयास्पद किंवा अपूर्ण नोंदी वेळेवर शोधून दुरुस्त करण्यासाठीच ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

नागरिकांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आणि परिसरातील मतदार यादीतील तपशीलही तपासावेत. नाव, पत्ता, वय किंवा इतर माहिती चुकीची असल्यास अथवा संशयास्पद नोंद आढळल्यास संबंधित बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकृत माध्यमांद्वारे तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार आहे. त्यामुळे प्रत्येक नोंद अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. SIR मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतल्यास बोगस, चुकीच्या किंवा अपूर्ण नोंदी दूर होऊन अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार होण्यास मोठी मदत होणार आहे.