Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली मोकाट जनावर

हिंगोली शहरातील गांधी चौकात मोकाट जनावरांचा गंभीर प्रश्न

Hingoli Stray Animal: गांधी चौकात दिवसभर मोकाट जनावरांनी वाहन आणि पादचारींचा अडवला आहे. सकाळी सायंकाळी वेळेत समस्येच्या कारणाने अपघातांची शक्यता अधिक झाली आहे.


हिंगोली शहरातील गांधी चौकात मोकाट जनावरांचा गंभीर प्रश्न

Hingoli Stray Animal |

 

वाहतुकीस नेहमीच अडथळा ,वाहन चालक व सामान्य नागरिक त्रस्त

हिंगोली (Hingoli Stray Animal) : शहरातील मध्यवर्ती व नेहमी गजबजलेल्या गांधी चौक परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मुख्य रस्त्यावर दिवसभर जनावरे ठाण मांडून बसत असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून वाहनचालक व पादचारी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत चौकात वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत आहे. दुचाकीस्वारांना जनावरांमुळे अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे. अनेक वेळा किरकोळ अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन व वाहतूक शाखेकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहराच्या प्रमुख चौकातच अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मोकाट जनावरांमुळे (Hingoli Stray Animal) व्यापाऱ्यांनाही फटका बसत असून ग्राहकांना दुकानदारांकडे ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर साचणाऱ्या घाणीमुळे परिसराच्या स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गांधी चौक परिसरातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, नियमित मोहीम राबवून जनावरे हटवावीत तसेच वाहतूक सुरळीत करण्यात यावी. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून केली जात आहे.