Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

धानोरा-वाईगोळ रस्ता

धानोरा-वाईगोळ रस्ता कामात अनियमितता; अतिक्रमणबाबत चौकशी करण्याची मागणी!

Dhanora-Waigol Road: धानोरा-वाईगोळ रस्त्याच्या कामात अतिक्रमणबाबत निलेश प्रकाश राठोड यांनी तकरार केली. जिल्हाधिकारीने चौकशी व करवाईसाठी मागणी करावी असे म्हटले आहे.


धानोरा-वाईगोळ रस्ता कामात अनियमितता अतिक्रमणबाबत चौकशी करण्याची मागणी   

Dhanora-Waigol Road |

मानोरा (Dhanora-Waigol Road) : तालुक्यातील धानोरा ते वाईगोळ या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि अतिक्रमणाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप फुलउमरी येथील निलेश प्रकाश राठोड यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे मागणी जिल्हाधिकारी याजकडे तक्रारकर्त्याने केली आहे.  
   
धानोरा ते वाईगोळ या (Dhanora-Waigol Road) रस्त्याचे काम सध्या सुरू असून या मार्गावर फुलउमरी हे गाव मानोरा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाला लागूनच हा मार्ग जात असल्याने रस्त्याच्या दर्जा व अतिक्रमणामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गावर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. ते हटवण्यासाठी संबंधित आय.सी.सी. इन्फ्राटेक कंपनीने फुलउमरी ग्रामपंचायतीस पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार काही लोकांनी अतिक्रमण हटविले आहे, परंतु काही लोक अजूनही अतिक्रमण हटविण्यास तयार नाहीत. इस्टिमेटनुसार २४ मीटर अतिक्रमण हटविण्याचे कामही टाळाटाळ करून रखडवण्यात येत आहे.

या बाबतीत कामावर पाहणी करणारे सुपरवायझर, इंजिनिअर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात शंका निर्माण होत आहे की, सुपरवायझर, इंजिनिअर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी एकमेकांशी संगनमत करून काम सुरू ठेवले आहे. तसेच रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.  

कोट्यवधी रुपये खर्चून होणाऱ्या या रस्त्याच्या कामात पारदर्शकता नसल्याने शासकीय निधीचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  आजपर्यंत गावातील सांडपाणी रस्त्यावरून वाहून जात होते. परंतु आता रस्त्याची उंची वाढविल्यामुळे ते पाणी लोकांच्या घरात जाण्याची शक्यता वाढली आहे. (Dhanora-Waigol Road) रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा संपूर्ण मार्ग बंद होण्याची शक्यता असल्याने गावातील सांडपाणी घरामध्ये साचण्याची व लोकांना त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, रस्त्याचे काम दर्जेदार करावे आणि अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी जिल्हाधिकारी याजकडे निलेश राठोड यांनी केली आहे.

Related to this topic: