Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

समृद्धी महामार्गावरील लुट प्रकरण

समृद्धी महामार्गावरील लुटीचा पर्दाफाश; चिखली तालुक्यातील पाच आरोपी जेरबंद

Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्गावर प्रवाशांना तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा कारंजा शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश


समृद्धी महामार्गावरील लुटीचा पर्दाफाश चिखली तालुक्यातील पाच आरोपी जेरबंद

Samruddhi Mahamarg Robbery |

 

चिखली डीबी पथकाच्या मदतीने कारंजा पोलिसांची धडक कारवाई

चिखली (Samruddhi Mahamarg Robbery) : समृद्धी महामार्गावर प्रवाशांना तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा कारंजा शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला असून, चिखली पोलिसांच्या डीबी पथकाच्या मदतीने चिखली तालुक्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले व पाच मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील पटणा जिल्ह्यातील नंदलालाबाद येथील रहिवासी तथा बँक व्यवस्थापक प्रशांत युधिष्ठिर रंजन (वय ३८) हे २७ जुलै रोजी समृद्धी महामार्गाने रायपूरकडे जात होते. पहाटे सुमारे तीनच्या सुमारास कारंजा (लाड) परिसरात थकवा जाणवल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून विश्रांती घेतली. त्यावेळी काही अनोळखी इसमांनी तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. या लुटीत ८ हजार ५७० रुपये रोख व सुमारे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने असा एकूण सुमारे १८ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता.

या (Samruddhi Mahamarg Robbery) प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली. स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम आणि कारंजा शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान आरोपी चिखली तालुक्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची मदत घेण्यात आली. तपासात हर्षद पांडुरंग साबळे (रा. गजानन नगर, चिखली), चेतन संजय माने (रा. बोरगाव वसू), ओम सुरेश सपकाळ (रा. बोरगाव वसू), धनंजय उज्ज्वलसिंग कमळीक (रा. दिवठाणा) आणि गोपाळ श्रीकृष्ण मोरे (रा. दिवठाणा) यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. त्यानुसार प्रथम हर्षद साबळे याला  ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित आरोपींनाही अटक करण्यात आली.

आरोपींकडून गुन्ह्यातील ८ हजार ५७० रुपये रोख रक्कम, एक हुंडाई व्हर्ना कार, लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले आणि पाच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या (Samruddhi Mahamarg Robbery) प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर करीत आहेत. ही कारवाई कारंजा शहर पोलीस निरीक्षक अमर चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम आणि कारंजा शहर पोलिसांनी केली. या मोहिमेत चिखली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई तसेच राहुल पायघन, ज्ञानेश्वर शिंदे, प्रशांत धंदर, अजय इटवा आदी पोलिसांनी मोलाची मदत केली.