Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी बँक निवडणुक

परभणीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडणुकीत दोन आमदार व इतर सहा जण विजयी...!

Parbhani Bank Elections: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चुरशीच्या निवडणूकीत  आ.सईद खान, आ.चंद्रकांत नवघरे, शोभा बोबडे, राजामती मुटकूळे, नंदकुमार डाखोरे, आकाश चोखट, अभय सावंत, दत्तात्रय मायंदळे


परभणीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडणुकीत दोन आमदार व इतर सहा जण विजयी

Parbhani Bank Elections |

 

८ संचालकामध्ये आ.सईद खान, आ.नवघरे, श्रीमती बोबडे, मुटकुळे, डाखोरे, चोखट, सावंत, मायंदळे हे विजयी....!

परभणी (Parbhani Bank Elections) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चुरशीच्या निवडणूकीत  आ.सईद खान, आ.चंद्रकांत नवघरे, शोभा बोबडे, राजामती मुटकूळे, नंदकुमार डाखोरे, आकाश चोखट, अभय सावंत, दत्तात्रय मायंदळे हे विजयी झाले आहेत. बँकेच्या एकूण २१ संचालकापैकी १३ संचालक बिनविरोध निवडूण आले होते. उर्वरीत ८ संचालकासाठी रविवारी मतदान झाले तर आज मतमोजणी पूर्ण झाली. 

प्राथमिक कृषी पत पुरवठा विविध कार्यकारी सेवा संस्था गटातील पूर्णा मतदार संघातून नंदकुमार डाखोरे हे विजयी झाले असून त्यांना ३४ मते पडली. तर पराभूत तुळशीराम बोबडे यांना २८ मते पडली. मानवत मतदार संघातून आकाश चोखट हे विजयी झाले आहेत. त्यांना २० मते पडली. तर पराभूत अमोल कदम यांना १५ मते पडली. हिंगोली मतदार संघातून राजामती मुटकूळे ह्या विजयी झाल्या असून त्यांना ५९ मते तर पराभूत गणेश श्ािंदे यांना ३१ मते पडली. वसमत मतदार संघातून आ.चंद्रकांत नवघरे हे विजयी झाले असून त्यांना ५८ मते पडली.

तर पराभूत तुषार जाधव यांना २० मते पडली. कळमनुरी मतदार संघातून अभय सावंत विजयी झाले असून त्यांना ३५ मते पडली. तर पराभूत बालासाहेब मगर यांना ३० मते पडली. इतर शेती संस्था गटातून आ.सईद खान विजयी झाले असून त्यांना २९० मते पडली. तर पराभूत विजय जामकर यांना २८७ मते पडली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गटातून शोभा बोबडे ह्या विजयी झाल्या असून त्यांना १२१६ मते पडली. तर पराभूत अतुल सरोदे यांना १७६ मते मिळाली. विमुक्त जमाती, भटक्या जमाती, वि.मा.प्र. गटातून दत्तात्रय मायंदळे विजयी झाले असून त्यांना १०६६ मते पडली. तर पराभूत स्वराजसिंह परिहार यांना ३४८ मते पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी.काकडे यांनी निकाल घोषीत करुन विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान केले. (Parbhani Bank Elections) मत मोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एम.यू.यादव, बी.एस.नांदापुरकर, लेखा परिक्षक राजेश देशमुख, लोणीकर यांनी परिश्रम घेतले. मत मोजणी शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.