Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Parbhani Agricultural Dispute

परभणीत शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी

Parbhani Farm Dispute: पालम  येथे शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडे चार ते सायंकाळी पाच या दरम्यान पालम तालुक्यातील राहटी शेत शिवार, भोगाव या ठिकाणी घडली.


परभणीत शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी

Parbhani Farm Dispute |

 

पालम तालुक्यातील घटना; परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल...!

परभणी (Parbhani Farm Dispute) :  पालम  येथे शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडे चार ते सायंकाळी पाच या दरम्यान पालम तालुक्यातील राहटी शेत शिवार, भोगाव या ठिकाणी घडली. दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरुन पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिला शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, आरोपींनी संगणमत करत फिर्यादी व तिच्या सासूला तुम्ही आमच्या शेताचा धुरा का काढत आहात, असे म्हणाले असता आम्ही धुरा काढला नाही, असे उत्तर दिल्यानंतर आरोपींनी हातातील कत्ती, दगडाने मारहाण करत जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी खंडू दत्ता लांडे, यमुनादास सोपान लांडे, मंगेश सुरेश लांडे, परमेश्वर पांडुरंग लांडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. लोखंडे करत आहेत. तर दुसरी तक्रार खंडू दत्तराव लांडे यांनी दिली आहे.

आरोपींनी संगणमत करत फिर्यादी व त्यांचा मुलगा गोरखनाथ लांडे यास तुम्ही कोण आमच्या शेतीचे भांडण मिटविणारे, असे म्हणत शिवीगाळ करत दगडाने मारुन जखमी केले. गोरखनाथ लांडे याला विळ्याने मारुन जखमी केले. तुम्ही जर आमच्या भांडणात आलात तर तुम्हाला खतम करु टाकू, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या (Parbhani Farm Dispute) प्रकरणी उत्तम शिंदे, राजू उत्तम शिंदे, ज्ञानोबा तातेराव ढगे, नामेदव रामजी ढगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोह. बले करत आहेत.