Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पुर महिला मृत्यू

आडगाव बाजार येथील महिलेचा ओढ्याच्या पाण्यात वाहून मृत्यू; दौडगाव शिवारात आढळला मृतदेह

Flood Woman Death: आडगाव बाजारातील मंगल खंडागळे याने ओढ्याला वाहून गेल्याची घटना झाली. त्याचे मृतदेह औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगावला आढळले.


आडगाव बाजार येथील महिलेचा ओढ्याच्या पाण्यात वाहून मृत्यू दौडगाव शिवारात आढळला मृतदेह 

Flood Woman Death |

औंढा नागनाथ (Flood Woman Death) : जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील मंगल शेषराव खंडागळे वय ६४ वर्ष ही महिला ३० जून रोजी सायंकाळी शेतातून घराकडे जात होती यादरम्यान आडगाव फाटा रोडवरील ओढ्याला आलेल्या पुरामध्ये सदरील महिला वाहून गेल्याची घटना घडली होती यानंतर महिलेचा शोध घेतला असता मंगल खंडागळे या महिलेचा दिनांक एक जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव येथील ओढ्यातील बंधाऱ्यालगत मृतदेह (Flood Woman Death) आढळून आला.

माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार रविकांत हरकळ, शाहेद सय्यद,किशोर पारीसकर, तानाजी ढाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला यानंतर मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे घटनेबाबत अद्याप औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.