Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी रेल्वे चोरी

परभणीत खिडकीतून हात आला अन् लाख रुपयाची चैन लंपास

Parbhani Railway Theft: रेल्वेची गती कमी असताना अचानक खिडकीतून अनोळखी इसमाने हात टाकून एका महिलेच्या गळ्यातून लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन लंपास केली.


परभणीत खिडकीतून हात आला अन् लाख रुपयाची चैन लंपास

Parbhani Railway Theft |

मानवत रोड रेल्वे स्थानकावरील घटना; अनोळखीवर गुन्हा दाखल
मानवत रोड स्टेशन हा चोरट्यांच्या अड्डा बनला असून त्याच्यावर ठोस कारवाई
लोहमार्ग पोलीस व वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष

परभणी (Parbhani Railway Theft) : मानवत रोड येथील रेल्वे स्थानकावरुन मराठवाडा एक्सप्रेस सुटली. रेल्वेची गती कमी असताना अचानक खिडकीतून अनोळखी इसमाने हात टाकून एका महिलेच्या गळ्यातून लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन लंपास केली. ही घटना २६ जून रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी २७ जुनला अनोळखी चोरट्यावर लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधुरी चंद्रकांत शेंदुरकर यांनी फिर्याद दिली आहे. त्या मराठवाडा एक्सप्रेसने छत्रपती संभाजी नगर ते नांदेड असा प्रवास करत होत्या. रात्री नऊच्या सुमारास गाडी मानवत रोड रेल्वे स्टेशनवर आली. येथून गाडी सुटल्यावर  गाडीची गती असल्याने याचाच फायदा घेत अनोळखी इसमाने खिडकीतून हात घालत फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून पोबारा केला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर
रेल्वेत प्रवास करत असताना प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे दिसत आहे. (Parbhani Railway Theft) प्रवाशांजवळील मोबाईल, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू चोरटे लंपास करत आहेत. पूजा जैन या रायपूर एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्यांच्या जवळील पर्स चोरट्यांनी लंपास केली. यामध्ये ८ हजार रुपये होते. त्याच प्रमाणे अलीम खान यांच्या जवळील ३२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि अंबादास चाफळे यांच्या जवळील ८ हजार रुपये िंकमतीचा मोबाईलही रेल्वे प्रवासात चोरी गेला आहे.