Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

पालम तरुण आत्महत्या

मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

Palam youth suicide: सायंकाळी अंजनवाडी-शेखराजूर फाट्यावरील गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर धाब्यात मराठी मारण्याचा अपमान झाल्यानंतर एक युवकाने आत्महत्या केली.


मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

Palam youth suicide |

 

अंजनवाडी ते शेखराजूर फाट्याजवळील घटना; धाब्यावर झाली होती मारहाण

पालम (Palam youth suicide) : धाब्याचे नुकसान का केले म्हणून एका युवकाला मारहाण करण्यात आली होती. हा अपमान सहन न झाल्याने सदर युवकानेविषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोन जणांवर पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही (Palam youth suicide) घटना २१ जूनच्या सायंकाळी साडे सात च्या सुमारास अंजनवाडी ते शेखराजुर फाट्यावरील गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील धाब्यावर घडली. 

मारोती किशनराव खेडकर वय ३३ वर्ष, असे मयत तरुणाचे नाव आहे. या बाबत मयताचा भाऊ पांडुरंग किशनराव खेडकर यांनी तक्रार दिली आहे. आरोपी देवराव कोडींबा गायकवाड, विठ्ठल कोडींबा गायकवाड या दोघांनी मारोती खेडकर याला आमच्या धाब्याचे नुकसान का केले म्हणून लोखंडी रॉड, काठीने मारुन गंभीर जखमी केले. हा अपमान सहन न झाल्याने मारोती खेडकर याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. त्याला (Palam youth suicide) आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि. मंजुषा मोरे करत आहेत.