Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

रान डुकर हल्ला

इसापूर येथे रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

Wild boar attack: पेरणी करीत असताना अचानक रान डुकराच्या कळपातील एका रान डुकराने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याने त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.


इसापूर येथे रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

Wild boar attack |

हिंगोली (Wild boar attack) : तालुक्यातील इसापूर रमना येथे पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी वर्ग कामाला लागला आहे. पेरणी करीत असताना अचानक रान डुकराच्या कळपातील एका रान डुकराने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याने त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, आता पावसाळा सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी व हळद लागवडी साठी तयारी चालविली आहे. शनिवारी ही अशोक जगताप या शेतकऱ्यावर रान डुकराने हल्ला केला असून पुन्हा रविवारी त्यात तान्हाजी  हरिभाऊ जगताप आपल्या शेतात  हळदीची लागवड करीत असताना  रान डुकराचा  कळप जात असताना एका भटकलेल्या रान डुकराने शेतात  तान्हाजी जगताप हळद लागवड करीत होते. ते आपल्या कामात मग्न होते. तेवढ्यात रानडुकराने हल्ला (Wild boar attack) करून  त्यांच्या पायाला व मांडीला जोरदार चावा घेत जखमी केले. त्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने आरडा ओरडा केला असता  तेवढ्यात बाजूच्या शेतकऱ्यांनी धावा घेत त्यांना तश्याच अवस्थेत दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

सरकारी रुग्णालयात डॉक्टरानी उपचार केले. दरम्यान (Wild boar attack) रानडुकराचा त्रास शेतकऱ्यांना नेहमीच होत असतो.  पिके आल्यावर फस्त करून शेतकऱ्यांचे नुकसान करतात तर कधी  हल्ला करणे,  अश्या घटना वारंवार घडत आहेत. शेतकऱ्यावर हल्ला होण्याची ही काही पाहिली घटना नाही, आजपर्यंत अश्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. परंतू या कडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे.  रान डुकराचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा  वन विभागाने ठोस पाऊले न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच रान डुकराच्या हल्यात जखमी झालेल्या तानाजी जगताप, अशोक जगताप यांना तातडीने वन विभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.