Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

खेत बचाव अभियान

बोटेकसा येथे 'खेत बचाव अभियाना'अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न; आधुनिक शेती आणि पोक्रा योजनेवर भर

Farm Rescue Mission: बोटेकसा येथील 'खेत बचाव अभियान' मध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, जल संवर्धन व खरीपपूर्वी निवेशण्याच्या पद्धतींमध्ये मार्गदर्शन देण्यात आले.


बोटेकसा येथे खेत बचाव अभियानाअंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न आधुनिक शेती आणि पोक्रा योजनेवर भर

Farm Rescue Mission |

कोरची (Farm Rescue Mission) : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक, तंत्रज्ञानयुक्त आणि हवामान अनुकूल शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा बोटेकसा येथे "खेत बचाव अभियान" अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पारंपरिक पद्धतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला.

बदलत्या हवामानात सेंद्रिय शेतीची कास धरा: महेश परांजपे
या (Farm Rescue Mission) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडसा येथील उपविभागीय कृषी अधिकारी महेश परांजपे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वाढता शेती खर्च आणि बदलत चाललेले हवामान यावर चिंता व्यक्त केली. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर वाढवावा, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपली शेती अधिक फायदेशीर कशी करावी, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चिरडे यांनी 'अल निनो' मुळे हवामानात होणाऱ्या बदलांची आणि त्याच्या शेतीवरील परिणामांची शेतकऱ्यांना जाणीव करून दिली. यावर प्रभावी उपाय म्हणून त्यांनी थेट भात पेरणी (DSR) तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली, ज्यामुळे पाण्याची आणि मजुरीची मोठी बचत होऊ शकते. तसेच, पिकांचे रोगांपासून रक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी पटवून दिले.

डॉ. लाकडे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. यामध्ये शेततळे, शेततळे अस्तरीकरण आणि बोडी खोलीकरण यांसारख्या जल व मृद संधारणाच्या कामांद्वारे पाण्याचे स्त्रोत बळकट कसे करावेत, तसेच खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नियोजन कसे असावे, हे त्यांनी समजावून सांगितले.

कोरचीचे तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी पोक्रा योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, अर्ज करण्याची सोपी पद्धत आणि त्यातील पारदर्शकता यावर प्रकाश टाकला. तसेच, शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या पीक प्रात्यक्षिकांबद्दल माहिती देऊन नवीन वाणांचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी केवळ तात्विक माहिती न देता, मंडळ कृषी अधिकारी डी. जे. मसराम यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर प्रत्यक्ष बीज प्रक्रिया  कशी करावी आणि पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी, याचे जिवंत प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोटेकसा आणि परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना खरीप पूर्व नियोजनाची अत्यंत मोलाची माहिती मिळाली. DSR तंत्रज्ञान, पाण्याचे स्त्रोत बळकट करणाऱ्या योजना आणि प्रत्यक्ष बीज प्रक्रियेचे धडे मिळाल्यामुळे आगामी हंगामात उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकतेत वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोक्राचे प्रकल्प सहाय्यक अमित केराम, सहाय्यक कृषी अधिकारी सुनील जमकातन, प्रथमेश कराडे, पीएम किसानचे, अविनाश हुमणे आणि बोटेकसा येथील कृषिताई श्रीमती टिकुला भानारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related to this topic: