Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी दुचाकी अपघात

परभणीत भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू...!

Parbhani Bike Accident: परभणीत दैठणा गावाजवळील महाराणा प्रताप चौकावर दुचाकीच्या वाहनाचा धडका झाला. अपघातामुळे शेख हमीद शेख गफारला गंभीर जखम झाली


परभणीत भीषण अपघात दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Parbhani Bike Accident |

 

दुचाकी-चारचाकीची समोरासमोर धडक; अपघातांची मालिका सुरुच

परभणी (Parbhani Bike Accident) : गंगाखेड महामार्गावरील दैठणा गावाजवळील महाराणा प्रताप चौकात मंगळवार १६ जून रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. सदर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून यामध्ये निष्पाप नागरीकांना आपला जिव गमवावा लागज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख हमीद शेख गफार (वय ४०, रा. ताडकळस) हे दुचाकी (क्र. एमएच-२२-बीडी-३८६४) वरून गंगाखेडकडून परभणीकडे जात होते. त्याचवेळी परभणीकडून गंगाखेडकडे जाणारी चारचाकी (क्र. एमएस-५७-बी-४२९१) दैठणा गावाजवळील महाराणा प्रताप चौकात आली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या (Parbhani Bike Accident) भीषण अपघातात शेख हमीद शेख गफार गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दैठणा येथील दीपक कच्छवे, ज्ञानेश्वर कच्छवे, सोपान आगराळे व संदीप शिसोदे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमीला रुग्णवाहिकेद्वारे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ताडकळस येथील नागरिक, लोकप्रतिनिधी व नातेवाईकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात धाव घेतली. 

या (Parbhani Bike Accident) दुर्दैवी घटनेमुळे ताडकळस परिसरात हळहळ व्यक्त होत असून दैठणा गावाजवळ वारंवार होणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन व महामार्ग पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.  बुधवार १७ जून रोजी सकाळी ९ वाजता ताडकळस येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ व एक आठ महिन्याची मुलगी आहे.