Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

शेतकरी अन्नत्याग आंदोलन

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन अहमदपूरमध्ये

Farmers' Hunger Strike: 'अन्नत्याग' आंदोलनात शेतकर्यांना २०१९पासूनच उलटलेल्या करजमाफीचा लाभ व करजसुलतीच्या ५०,००० रु. मर्यादेचे बाधक काढण्यासाठी आवाज उठविण्यात येणार.


शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन अहमदपूरमध्ये

Farmers' Hunger Strike |

अहमदपूर (Farmers' Hunger Strike) : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज, दि. १३ जून रोजी अहमदपूर येथे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन (Farmers' Hunger Strike) आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात होणाऱ्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पीकविमा आणि आर्थिक सवलतींसह विविध मागण्यांसाठी आवाज उठविण्यात येणार आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील ५० हजार रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच एकरकमी समजोता (OTS) योजनेतील शेतकऱ्यांनाही समान न्याय मिळावा, अशी भूमिका (Farmers' Hunger Strike) आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. याशिवाय दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम आधी भरण्याची अट रद्द करणे, प्रोत्साहनपर अनुदानासाठी नियमित कर्जफेडीची अट शिथिल करणे, २०१७ मधील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देणे, तसेच पीकविमा योजनेतील शेतकरीविरोधी अटी रद्द करून अल्प प्रीमियममध्ये योजना पुन्हा लागू करणे या प्रमुख मागण्या आंदोलनात मांडल्या जाणार आहेत.

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी आर्थिक मदत मिळावी यासाठी बंद पडलेल्या कर्जखात्यांचे पुनर्गठन करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. "कर्जवसुली नकोच, कर्जमाफी हवीच" अशी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे शेतकरी हिताचे निर्णय तातडीने घेण्याचे आवाहन केले आहे. या (Farmers' Hunger Strike) आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस केदारअप्पा काडवे, कार्याध्यक्ष राजकुमार रामराव बोडके आणि तालुकाध्यक्ष संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, या अपेक्षेने परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.