Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

अमरावती एसआयआर प्रक्रिया

एसआयआर प्रक्रियेसाठी काँग्रेसची संघटनात्मक तयारी; जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

Amravati SIR Process: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, बूथ स्तरापर्यंत सक्षम यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात येत आहे.


एसआयआर प्रक्रियेसाठी काँग्रेसची संघटनात्मक तयारी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

Amravati SIR Process |

अमरावती (Amravati SIR Process) : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, बूथ स्तरापर्यंत सक्षम यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने आयोजित बैठकीस अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री यशोमतीताई देशमुख उपस्थित होत्या.

बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक (Amravati SIR Process) विधानसभा मतदारसंघात मतदार केंद्र स्तर प्रतिनिधी-१ यांची नियुक्ती करून त्यांचे अर्ज वेळेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक मतदार केंद्रावर मतदार केंद्र स्तर प्रतिनिधी-२ नियुक्त करून त्यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्याचेही सांगण्यात आले. तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या विधानसभानिहाय मतदार याद्या संबंधित प्रतिनिधींकडे सुपूर्द करणे, जिल्हास्तरीय एसआयआर समन्वय समिती स्थापन करून नियमित बैठका घेणे, तसेच प्रतिनिधींच्या कामावर देखरेख ठेवणे आणि निवडणूक प्रशासनाशी सातत्याने समन्वय राखणे, यावर विशेष भर देण्यात आला.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मदत केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या (Amravati SIR Process) मदत केंद्राच्या माध्यमातून चुकीने वगळलेल्या मतदारांना नमुना क्रमांक ६ भरण्यास मदत, बोगस मतदारांविरोधात नमुना क्रमांक ७ दाखल करणे, नोटिशींना आवश्यक कागदपत्रांसह उत्तर देणे तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले, “मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही काँग्रेसची प्राथमिक जबाबदारी आहे. SIR प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष राहण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने बूथ स्तरापर्यंत सक्रिय राहून काम करणे आवश्यक आहे. तसेच मतदार याद्यांमध्ये जर कोणत्याही प्रकारची गडबड करण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधितांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले जाईल. मतदार याद्या पारदर्शक आणि अचूक तयार व्हाव्यात यासाठी काँग्रेस विशेष लक्ष देऊन त्या तयार करून घेणार आहे.एकूणच, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने एसआयआर प्रक्रियेसाठी संघटनात्मक पातळीवर सज्जता दाखवली असून, मतदार याद्यांच्या अचूकतेसाठी व्यापक नियोजन हाती घेतले आहे.

बैठकीस माजी मंत्री यशोमतीताई देशमुख, हरिभाऊ मोहोळ, रामेश्वर अभ्यंकर, कांचनमाला गावंडे, प्रवीण मनोहर, सुनील गावंडे, वैभव वानखडे, नितेश वानखडे, प्रमोद दाळु, हरेराम मालवीय, नामदेव तनपुरे, सहदेव बेलकर, शैलेश मालवीय, किशोर देशमुख, श्रीकांत बोंडे, श्रीकांत झोडपे, राहुल गवई, अमोल धवसे, समीर दहातोंडे, प्रदीप देशमुख, अमोल होले, राजा खान, श्रीनिवास सूर्यवंशी, मनीष कुबडे, राहुल बोडखे, श्याम बेलसरे, विपुल भडांगे, भूषण कोकाटे, श्रीकांत होले, निखिल काटोलकर, राहुल गाठे, रमेश सावळे, गजानन देशमुख, विशाल खानजोडे आदींसह शहर व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related to this topic: