Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मोबाईल सेवा ठप्प

सहा दिवसांपासून रुई-गोस्ता परिसरात 'मोबाईल' सेवा ठप्प; जिओचे नेटवर्क गायब

Mobile Services Down: रूई - गोस्ता सह परिसरात गेल्या ६ दिवसांपासून एका आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपनी जिओची मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.


सहा दिवसांपासून रुई-गोस्ता परिसरात मोबाईल सेवा ठप्प जिओचे नेटवर्क गायब 

Mobile Services Down |

मानोरा (Mobile Services Down) : तालुक्यातील रूई - गोस्ता सह परिसरात गेल्या ६ दिवसांपासून एका आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपनी जिओची मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे परिसरातील डिजिटल व्यवहार, बँकिंग सेवा आणि संपूर्ण संपर्क यंत्रणा कोलमडून पडली आहे. दरमहा महागडे रिचार्ज करूनही सेवा मिळत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांमध्ये संबंधित कंपनीच्या दिशाहीन कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  

आजच्या डिजिटल युगात बँक खात्यातून पैशांची देवाणघेवाण, गुगल पे, फोन पे यांसारख्या सेवांवर (Mobile Services Down) नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र, मोबाईलला रेंज नसल्याने गावातील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. तसेच शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  पाच ते सहा दिवस उलटून गेले तरी संबंधित कंपनीच्या तांत्रिक विभागाने या समस्येकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.  

दरम्यान, मोबाईलच्या टॉवरमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, याची कोणतीही माहिती स्थानिक पातळीवर दिली जात नसल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ आणि संताप अधिक वाढला आहे. मोबाईल कंपनी दरमहा रिचार्जचे पैसे पूर्ण घेतात, मग (Mobile Services Down) ग्राहकांच्या वाया गेलेल्या दिवसांची नुकसान भरपाई कोण देणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत. मोबाईलचे नेटवर्क पूर्णवत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या रुई परिसरात जिओचे टॉवर आहे. या भागात (Mobile Services Down) मोबाईलला रेंज दाखवते कॉल लागत नाही, कदाचित कॉल लागला तर आवाज येत नाही. त्यामुळे टॉवर असूनही फायदा नाही. फोन लागत नसल्याने अनेक अडचणीचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत आहे. संबंधितांनी तात्काळ समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.