Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Manav Vikas Bus

दारूच्या नशेत मानव विकास बस चालविणाऱ्या चालकाविरुद्ध सेनगावात गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक रस्त्यावर दारूच्या नशेत मानव विकास बस चालविल्याप्रकरणी चालकाविरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दारूच्या नशेत मानव विकास बस चालविणाऱ्या चालकाविरुद्ध सेनगावात गुन्हा दाखल

Manav Vikas Bus |

सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक रस्त्यावर दारूच्या नशेत मानव विकास बस चालविल्याप्रकरणी चालकाविरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बापुराव कुमरे (रा. रिसाला बाजार, हिंगोली) हा एमएच-०६ एस-८७७५ क्रमांकाची मानव विकास बस मद्यप्राशन करून वाकडी-तिकडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. ही घटना सोमवारी, २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक रोडवर घडली.

या प्रकरणी वाहतूक निरीक्षक फिरोज मुस्तफा शेख (रा. हिंगोली) यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात मद्यधुंद वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार आर. जे. जाधव करीत असून, आरोपीस नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित विभागाने अशा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: