Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मलकापूर अभ्यासिका

मलकापूर नगरपालिकेची तयार अभ्यासिका धुळखात

Malkapur Study Centre: गेल्या दोन वर्षांपासून मलकापूर नगरपालिकेची सुसज्ज अभ्यासिका तयार असूनही ती अद्याप कार्यान्वित न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता


मलकापूर नगरपालिकेची तयार अभ्यासिका धुळखात

Malkapur Study Centre |

२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आमदार चैनसुख संचेतींकडून पाहणी, लवकरच सुरू करण्याचे आश्वासन

मलकापूर (Malkapur Study Centre) : गेल्या दोन वर्षांपासून मलकापूर नगरपालिकेची सुसज्ज अभ्यासिका तयार असूनही ती अद्याप कार्यान्वित न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. प्रशासकीय उदासीनतेमुळे धूळ खात पडलेली ही अभ्यासिका सध्या मद्यपी आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे. या गंभीर समस्येकडे वृत्तपत्रांनी लक्ष वेधल्यानंतर, आमदार चैनसुख संचेती यांनी आज, २५ जुलै रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अभ्यासिकेची पाहणी केली आणि लवकरच ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करण्याचे आश्वासन दिले.

अभ्यासिका की 'नशेचा अड्डा'?

​लाखों रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही अभ्यासिका वेळेत सुरू न झाल्यामुळे तिची मोठी दुरवस्था झाली आहे. अभ्यासिका परिसरात दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. शांततेत अभ्यास करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जागेचा वापर रात्रीच्या वेळी असामाजिक तत्त्वांकडून नशेसाठी केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. वृत्तपत्रांमध्ये या दुरवस्थेबाबत बातम्या प्रसिद्ध होताच स्थानिक प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

आमदारांची पाहणी अन्‌ महत्त्वाच्या घोषणा
​वृत्तपत्रांमधील वृत्ताची दखल घेत आमदार चैनसुख संचेती यांनी २५ जुलै रोजी अभ्यासिकेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी परिसराच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली व लवकरात लवकर ही अभ्यासिका कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.

​आमदार संचेती यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की: "ही अभ्यासिका लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व इतर अभ्यासासाठी लागणारी सर्व प्रकारची आवश्यक पुस्तके, सर्व अभ्यासक्रम आणि विशेषतः भारताचा इतिहास दर्शवणारे उत्कृष्ट ग्रंथ या अभ्यासिकेत उपलब्ध करून दिले जातील. मलकापूरच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य व सुरक्षित वातावरण मिळवून देणे ही आमची प्राथमिकता आहे."

​विद्यार्थी व पालकांमध्ये आशेचा किरण
​आमदारांच्या या आश्वासनानंतर आता ही (Malkapur Study Centre) अभ्यासिका प्रत्यक्षात कधी सुरू होते, याकडे मलकापूर शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष लागले आहे. परिसरातील असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करून लवकरात लवकर सुरक्षारक्षक तैनात करावा आणि ग्रंथालय सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Related to this topic: