Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मलकापूर बाबा बर्फानी ग्रुप

मलकापूर चां बाबा बर्फानी ग्रुप अमरनाथ यात्रेला रवाना

Malkapur Baba Barfani Group: मलकापूर येथील नवयुवक सालाबादप्रमाणे यंदाही अमरनाथ यात्रेला मलकापूर बसस्थानक येथील जागृत हनुमान मंदिर येथून मोठ्या उत्साहात यात्रेला प्रारंभ


मलकापूर चां बाबा बर्फानी ग्रुप अमरनाथ यात्रेला रवाना

Malkapur Baba Barfani Group |

मलकापूर (Malkapur Baba Barfani Group) : "भुके को अन्न प्यासे को पाणी जय बाबा बर्फानी" च्या जयघोषात मलकापूर येथील बाबा बर्फानी ग्रुप अमरनाथ यात्रेसाठी आज रात्री रवाना झाला. मलकापूर येथील नवयुवक सालाबादप्रमाणे यंदाही अमरनाथ यात्रेला मलकापूर बसस्थानक येथील जागृत हनुमान मंदिर येथून छत्रपती शिवाजी नगर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोठ्या उत्साहात यात्रेला प्रारंभ केला.  (Malkapur Baba Barfani Group) यात्रेदरम्यान तीन राज्यातील प्रमुख देवस्थानचे दर्शन जसे पंजाब येथील अमृतसर येथील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर, अंबा टेम्पल,वाघा बॉर्डर अटारी तिथून हिमाचल प्रदेश येथील नैना देवी, चिंतपूर्णी माता, ज्वाला माता, कांगडा देवी, वलखंड बगलामुखी, चामुंडा देवी करून जम्मू काश्मीर येथील माता वैष्णोदेवी, शिवखोरी करून बाबा अमरनाथ दर्शन घेऊन यात्रा मलकापूर येथे समारोप करते.
 
यात्रेला (Malkapur Baba Barfani Group) जाणाऱ्यांमध्ये गजानन देशमाने, अनिल हुंबे, सूर्यकांत उंबरकर, नरेंद्र तिवारी, उमेश कोल्हे, गोपाल गाडेकर, राहुल सणांसे, सुनील खिरोळकर, प्रवीण बारिंगे, राहुल बगाडे, रोहित ठोसर, प्रथमेश व्यवहारे, सुपेश बोंबटकार, कृष्णा वैतकर, योगेश राजपूत, अक्षय शिंदे, कार्तिक हुंबे, गोपाल गोरले, अमोल हरमकर , मंगेश अमराळे, तेजस चव्हाण हे आहेत.